वर्धा जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढला, विदर्भाचे तापमान४२अंशावर, नागरिकांनी उन्हापासून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ञांनी केले आवाहन, नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे….

0

🔥वर्धा जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढला,विदर्भाचे तापमान४२अंशावर,

🔥नागरिकांनी उन्हापासून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ञांनी केले आवाहन,
नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे.

आर्वी,वर्धा -/ गेल्या काही दिवसापासून वर्धा जिल्हा तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असुन सूर्य देवता आपल्या वसुंधरेवर उष्णतेची प्रचंड आग ओतत आहेत. मागील आठवड्यापासुन तापमानाची सतत वाढ होत असुन पारा ४२ अंशावर पोहोचल्याने,नागरिकांची उष्णतेच्या पाऱ्याने ससेहोलपट होत आहेत.
…..उन्हाच्या तीव्र प्रकोपामुळे दुपारच्या १२.००-वाजता नंतर घराबाहेर पडतांना सर्वानाच उन्हाचा विचार करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्र, झळामुळे रस्त्यावरची गर्दी ओसरल्याचे आमच्या प्रतिनिधीने दुपारच्या वेळेत गावात फेरफटका मारला असता दिसून आले .
दरवर्षी एप्रिल महिन्यात वर्धा तथा विदर्भातील तापमानात वाढ होत असते. परंतु यावर्षी मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठून विक्रम प्रस्थापित केले होते. मार्चच्या दरम्यान काही दोन तिन दिवसाच्या कालावधीत ढगाळी.वातावरणामुळे व अकाली पाऊस बरसल्याने विदर्भातील. तापमानात घट झाल्याचे दिसून आले.
मात्र गेल्या काही दिवसापासून सुर्यदेवता आग होत असल्याने तापमानात सतत वाढ होत आहे.
तसेच दररोज तापमान वाढत असल्याने, वाढत्या तापमानाने सर्वच घटक हैराण झाले असुन, या ऊन्हाच्या प्रकोपामुळे,दाहततेमुळे अनेक ठिकाणी पक्षी व प्राणी मुत्यूमुखी पडत असल्याचे निदर्शनास येते.३एप्रिल, रोजी तापमानाचा पारा४०ते४१अंश सेल्सिअस मध्ये वर्धा जिल्ह्यात नोंदविला गेला,असे हवामान खात्याच्या नोंदीनुसार कळते. तीव्र आणि दाहक चटके लागणाऱ्या… उन्हामुळे सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना जाणवत होत्या…!
त्यामुळे घराबाहेर पडतांना देखील लोकांना आजही विचार करावा लागत आहेत. तसे पाहता सकाळपासूनच शहरातील प्रमुख शहरातील रस्त्यावर लोकांची गजबज असते. मात्र गेल्या आठवड्यापासून वाढत्या तापमानामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होवून ती विरळ झाल्याचे बहुतांश भागात दिसून येत आहेत. अर्थातच वाढलेल्या तापमानाचा फटका सर्वानाच बसू लागला आहेत. सायंकाळी ६वाजतानंतर ऊन कमी झाल्यावरच लोकांची रस्त्यावर वर्दळ वाढली दिसून येते. विशेष म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या येणाऱ्या आठवड्यात तापमानामध्ये वेगाने वाढ, होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहेत.
🔥आपल्या सौर मंडळात पुथ्वी या एकमेवर ग्रहावर जीवसृष्टी विकसित झाली आहेत. परंतु ग्लोबल वार्मिंग मुळे या ग्रहाला भविष्यात धोका निर्माण झाला आहेत. विकासाच्या नावाने आपल्या वसुंधरेचे काही विकसित, विकसनशील राष्ट्रे लचके तोडून जागतिक पर्यावरणाचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे जागतिक तापमानात. वाढ होत आहेत. त्यासाठी आता नैसर्गिक घटकांचा विचार करून वसुंधरेचे सरक्षण करणे हे शासन, प्रशासन, व नागरिकांचे आद्य कर्तव्य आहेत, असे माझे प्राजंळ मत.आहेत.
(सौ.मंजूषा अविनाश टाके
आर्वी जिल्हा. वर्धा)
🔥उन्हापासून आपल्या शरीराचे सरक्षण करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उपाशीपोटी उन्हात फिरू नयेत. शक्यतो डोळ्यावर चांगल्या कंपनीचे सन ग्लास घालून बाहेर फिरायला जावे.तसेच आहारात भरपूर फळे सेवन करून, टरबूज, खरबूज ही फळे आहारात असल्यास शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार. नाहीत.
(सौ सुनिता अरुण कहारे
पर्यावरण प्रेमी महिला आर्वी)
🔥दिवसोदिवस निसर्गाचे ऋतुचक्र बदलत असुन, वाढत्या प्रदुषणामुळे जगाचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. पर्यावरणात हाणीकारक वायू मिसळत असल्याने सौरमालीकेत आपल्या पुथ्वी ग्रहाचे अस्तित्व अतिशय धोकादायक स्थितीत आले आहेत. त्यामुळे आता इंधनाचा वापर सौर ऊर्जेचा केल्यास वातावरण थंड होईल, पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्याबरोबरच इतर पर्यावरण घटकांचा स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहेत.
(सौ.निलीमा सुरेंद्र गोठाणे
समाजसेवीका आर्वी जिल्हा.वर्धा)
🔥आपल्या अंतराळात अनेक. महाकाय, विशाल तारे,ग्रह, ब्लॅक होल अस्तित्वात आहेत. या ग्रहांच्या परिवलन व परिभ्रमणामुळे आपण पुथ्वी वर सुखाची झोप घेवू शकतो. परंतु अनियंत्रित विकासाच्या. नावाने चिन,अमेरिका, रशिया ,पाश्चात्य राष्टे् वसुंधरेवर आक्रमक करून, आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी वसुंधरेवचे.लचके तोडत आहेत. रशिया सारख्या राष्ट्राने.वसुंधरेच्या पोटात शेकडो किलोमीटर चे गड्डे करुन वसुंधरेचा भूगर्भातील संतुलन बिघडण्याचे काम केल्याने पुथ्वी वर.नैसर्गिक आपत्ती वाढणार आहेत. त्यामुळे आपल्याला परत निसर्गाच्या. सान्निध्यात चला अशी. आर्त.हाक दिल्या शिवाय गत्यंतर नाहीत, असे मला. वाटते.
(डॉक्टर शारदा महेशजी माथुरकर यवतमाळ)                                   

🔥ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गाचे पर्यावरणीय संतुलन बिगडले आहेत, त्यामुळे आपली हिरवीकंच वसुंधरा काळाच्या प्रवाहात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आपल्याला पर्यावरणाचा विचार समग्र दुष्टिने करणे गरजेचे आहेत.

(सौ.वंदना ज्ञानेश्वर आसोले शिक्षिका आर्वी)

🔥जागतिक क्षेत्रात युध्दजन्य परिस्थिती मुळे वसुधंरेवर प्रदुषण वाढत आहेत. कार्बनडाय आँक्साईड चे प्रमाण वाढत असल्याने आपली पुथ्वी धोकादायक वळणावर आली आहेत, त्यामुळे झाडे लावणे आता आवश्यक झाली आहेत.
(सौ.अर्चना पवनभाऊ शिरभाते
आर्वी जिल्हा. वर्धा)
🔥आपल्या वसुधंरेचे अस्तित्व आता,होण्याच्या मार्गावर असुन यालाही जबाबदार आहेत,तो माणव प्राणी आणि औद्योगिककरण आणि विकासाच्या नावाखाली आपल्या पुथ्वीला ओरबडण्यात येत आहेत. त्यामुळे जल,जमीन, झाडे, पशूपक्षी टिकले तरच आपली वसुंधरा टिकेल, अन्यथा विनाशकारी परिणामाला सज्ज राहावे, असे माझे प्राजंळ मत आहेत.
(सौ.कल्पना लक्ष्मण बोरवार
पर्यावरण अभ्यासिका आर्वी)

         ब्युरो रिपोर्ट साहसिक              News -/24 आर्वी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!