वर्धा जिल्ह्यातील ५० वर्ष पूर्ण झालेल्या दारू बंदी कायदयाचे फायदे सांगा.

0

जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर..

वर्धा -/ जिल्हा हा महात्मा गांधीजी यांच्या पावन स्पर्शाने जगभरात प्रसिद्ध आहे.स्वातंत्र्य लढ्यातील “चले जावं ” आंदोलनाचे आव्हान सेवाग्राम आश्रमातून गांधीजींनी केले त्यामुळे या भूमिला आपला एक इतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.गांधीजींच्या विचारांचा लोकांच्या जीवन मानावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून १९७४ साली गांधी जिल्हात “दारू बंदी कायदा” लागू करण्यात आला.संपूर्ण देशात गांधी जिल्हाचा मान फक्त वर्धा जिल्हाला मिळाला म्हणूनच दारू बंदी कायद्यामुळे या जिल्हातील नागरिकांना गांधींविचाराने प्रेरित होऊन लोकांच्या जीवन शैलीत इतर जिल्हाच्या नागरिकांच्या तुलनेत फरक पडेल त्यामुळे इथे गुन्हेगारीचे प्रमाण घटेल, पोलीस व न्यायालयीन यंत्रनेचा ताण कमी होईल लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसेल त्यामुळे या जिल्हातील बेरोजगार तरुणांना सरकारी व प्रायव्हेट नोकऱ्यान मध्ये मागणी वाढेल कदाचित असाच कयास दारू बंदी कायदा लागू करताना तत्कालीन महाराष्ट्र सरकारला वाटला असावा.तसेच या वर्षी या कायद्याला ५० वर्ष पूर्ण होत असून सरकारला अपेक्षित कोण कोण ते फायदे राज्य सरकारला झाले हे विचारण्यासाठी जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फे महात्मा गांधी पुतळा चौक येथे धरणे प्रदर्शन करून मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले आहे. व १५ दिवसात या बाबत माहिती वर्धा जिल्हातील लोकांना द्यावी अशी विनंती करण्यात आली.अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हातील नागरिकांच्या वतीने जय महाराष्ट्र युवा संघटन चे अध्यक्ष निखिल सातपुते यांच्या तर्फे देण्यात आला.यावेळी संघटनेचे सदस्य मंगेश भोंगाडे, किशोर बोकडे, सुशील शिरे, किशोर बाहे,कान्हा धोंगडे,अविनाश भांडे, अशोक भिवगडे, स्वप्नील डांगट, राहुल गोल्हर, योगेश चौधरी, प्रदीप मेंढे,संतोष धांदे,हरीश तिवारी,अमोल वांदिले, जयेश ठाकूर, शुभम सातपुते, प्रशांत बानकर, सचिन घोडमारे, गोकुळ इखार, पियूष दातलदार, अथर्व गहलोड,भास्कर वाळके, रोशन सुरकार, पंकज ठाकरे, तेजस उमाटे, रोशन भलावी, राहुल वैदय, सुमित वैदय, सुशांत जिवतोडे,राहुल चांदुरकर, बिपीनकुमार मोघे, महेश अडसूळे, दिपक राऊत, हर्षल व्यास, पंकज डाफे,लोभेश बोन्डे इत्यादी नागरिक सहभागी झाले.

गजानन जिकार साहसिक news -/24 तुळजापूर(वघाळा) 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!