सेलू -/ स्वयं शिक्षण प्रयोग, वेल्सपण फाउंडेशन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जी. आय. झेड. आणि डब्ल्यू. एच. एच. यांच्या सहकार्याने महिलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हिमोग्लोबिन तपासणीद्वारे त्यांचे आरोग्यनिदान करणे आणि पोषणयुक्त आहाराच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन करणे हा आहे.या कार्यक्रमाती डॉ. हर्षा गायकवाड, डॉ. अभिषेक जैन , डॉ. अर्जुन कुमार हरदास डॉ. ऋतुजा नगराळे, डॉ. प्रफुल्ल जगताप, योगिता नगराळे, मोनाली घांकर यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक सल्ला दिला. वेल्सपण फाउंडेशनचे उपमहाव्यवस्थापक सौरभ लोहानी यांनी शाश्वत शेती आणि आरोग्य यातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. सेंद्रिय व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी सेंद्रिय शेतीच्या फायद्यांबद्दल माहिती दिली, तर बीसीआय व्यवस्थापक दीपक खांडे यांनी कापूस उत्पादन आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर दिला. कार्यक्रम समन्वयक नम्रता गव्हाळे यांनी महिलांसाठी आरोग्य जागरूकता आणि पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.महिलांना किचन गार्डन तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तबसूम मोमीन आणि प्रशिक्षण समन्वयक माधव गोरकटे यांनी महिलांना विविध तंत्रज्ञान साधनांचा वापर करून प्रशिक्षण दिले. तसेच, या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयं शिक्षण प्रयोगचे क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर नावडकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.या उपक्रमाद्वारे आरोग्य उपकेंद्र, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक महिला लीडर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांच्या आहार व पोषण स्थितीचा आढावा घेतला जात असून, काही कालावधीनंतर पुन्हा तपासणी करून आरोग्यातील सकारात्मक बदल नोंदवले जाणार आहेत.या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातील अंजी, धानोरा, गोजी, जुनगड, खापरी, मजरा, पवनुर, शिवणगाव, झडशी, दहेगाव मिस्किन, देऊळगाव आणि पिंपळगाव या गावांमधील एकूण २४४ महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.यासोबतच, स्वयं शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून वर्धा आणि सेलू तालुक्यातील ३३ गावांमध्ये ५५० महिलांना भाजीपाला कीटचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांचा आठवड्याला होणारा सुमारे ५०० रुपयांचा खर्च वाचावा, विषमुक्त भाजीपाला त्यांना खायला मिळावा आणि किचन गार्डनमध्ये भाजीपाला लागवडीची सवय लागावी हा आहे. यामुळे महिलांना स्वतःच्या घरच्या घरी सुरक्षित आणि पौष्टिक भाजीपाला उपलब्ध होईल तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वेल्सपण फाउंडेशनचे सचिन शेंडे, प्रवीण लडी, सतीश हीवरकर, रूपाली वैद्य, भाग्यश्री बकाने, महेंद्र साठे अनिल गोल्हार, उमेश महाजन आणि सुनील गोमासे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होऊन नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भविष्यात या उपक्रमाचा अधिक विस्तार करून मोठ्या प्रमाणावर महिलांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.