वर्धा येथील इतवारा मार्केट मधील स्वच्छतेविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन….

0

वर्धा -/ नगरपरिषद यांच्या हद्दीत येत असलेल्या इतवारा बाजार मध्ये मच्छी मार्केटमध्ये पाच ते सहा ब्लॉक बनवलेले आहे परंतु त्यापैकी दोन ब्लॉक मध्ये दुकान भरतात व बाकीचे ब्लॉक खाली असल्यामुळे या मार्केटमधील लोक तेथे प्रसाधन  करतात त्यामुळे तेथील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे तसेच त्या ब्लॉक मध्ये रात्री कुणी येऊन राहतात तर कुणी दारू पिऊन झोपतात काही दिवसा अगोदर तिथे लावारिस लाश सुद्धा आढळली होती त्यामुळे इतवारा परिसरात लोकांना त्या ब्लॉकमुळे भरपूर भीती वाटतात कारण त्या ब्लॉग मध्ये रात्रीला अंधार असतात त्यामुळे महिला बाहेर निघण्यास धजावत नाहीत आणि काही रोड रोमियो सुद्धा गलत मार्ग अवलंबतात त्यामुळे मा आमदार डॉ पंकज भोयर यांना 17 नो 2024 आणि नगरपरिषद मुख्याधिकारी ज्यांना 27 9 2024 ला लेखी निवेदन दिले होते परंतु त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे इतवारा परिसरातील नागरिक यांनी युसुफ भाई पठाण शेतकरी योद्धा अमोल ठाकरे,भाभी. पठाण मालिन बाई कर्वे. जय सावळे यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ताबडतोब याचा बंदोबस्त करावा व त्या मार्केटला रिकाम्या असलेला ब्लॉक ला लोखंडी गेट लावण्यात यावा व त्या परिसराची स्वच्छता करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली जर असे झाले नाही तर येत्या आठ ते दहा दिवसात इतवारा येथील नागरिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल असे या निवेदनातून सांगण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!