🔥श्री संत सावजी महाराज पुण्यतिथी सोहळा. विविध कार्यक्रमात महाप्रसाद दि. १८ जानेवारी ला दिंडी पालखी सोहळा.
वर्धा -/ येथील श्री संत सावजी महाराज देवस्थान च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत सावजी महाराज यांच्या ३२व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन बॅचलर रोड परिसर आर्वी नाका दि. १७ व १८ जानेवारी २०२६ ला करण्यात आले आहे. दैनदिन कार्यक्रमात सकाळी श्री चे मंगलस्नान. काकडा आरती. भजन. कीर्तन. भारूड. भाव भक्तीगीत भजन. हरिपाठ. प्रवचन. होम हवन गोपालकाला व महाप्रसाद व दिंडी- पालखी. शोभायात्रा आदी कार्यक्रम संपन्न होत आहे. शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ ला सकाळी ६ ते ८.३० दरम्यान गुरू माऊली विठ्ठल रखुमाई चे मंगलस्नान. विधीवत अभिषेक. विणा आरंभ.कलेशस्थापना. होम हवन. कार्यक्रम. डॉ. मनोहर जळगावकर यांच्या हस्ते. १० ते १२ दरम्यान हरी भक्त पारायण शोभाताई बानोस्कर यांचे प्रवचन. १२ ते १.३० दरम्यान श्री संत सावजी महाराज यांचे नातू कृष्णा महाराज काकपूरे बुलडाणा. यांचे कीर्तन. गुरूकृपा भजन मंडळ हनुमान गढ वर्धा यांच्या सुमधुर खंजिरी भजनावलीचा कार्यक्रम. ३.३० ते ५.३० दरम्यान गुरू माऊली पालखी सोहळा. सायंकाळी ५.३० ते ७.३० दरम्यान हरिपाठ. भारूड. हभप. यशवंतराव डहाके .हभप.रूपराव खैरकार व संच भजनावली चा कार्यक्रम.
रविवार दि. १८ जानेवारी २०२६ ला दैनदिन विविध कार्यक्रमात श्री चे पूजन व गोपालकाला व महाप्रसाद. ७.३० ते ९.३० पाक्षाळपूजाचे भजन सादरीकरण गुरूदेव उपासक श्री रूपराव खैरकार.व साथसंगत संच.कार्यक्रम संपन्न होत आहे. या वेळी . श्री संत सावजी महाराज पदाधिकारी. सदस्य व गुरूदेव भक्त. गुरूदेव उपासक. सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी कार्यक्रमाचा भाविकांनी उपरोक्त आध्यात्मिक धार्मिक सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सावजी महाराज देवस्थान कमिटी व भाविकांनी केले आहे.