वर्धेच्या जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये जागतिक महिला दिन साजरा…

0

वर्धा / येथे जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा, येथे नुकताच जागतिक महिला दिनानिमित्त, विधी सेवा प्राधिकरण वर्धा व वर्धा वकील संघाच्या महीला वकील यांच्या, संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वर्धा न्यायालयातील सर्व महिला न्यायाधीश तसेच सर्व महिला कर्मचारी व सर्व महिला वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. राय मैडम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ श्रीमती. अदोने मैडम व प्रमुख वक्ते म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती.अस्नारी‌ मैडम तसेच वरिष्ठ दिवानी न्यायाधीश श्रीमती. शेजवळ मैडम व प्रथम श्रेणी न्यायाधीश श्रीमती. ताकभोरे मैडम व वरीष्ठ अधिवक्ता ॲड.श्रीमती.विभा देशमुख मैडम मंचावर उपस्थित होते. न्यायाधीश श्रीमती. शेजवळ मैडम यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या कायद्याच्या तरतुदी विषद केल्यात तर न्यायाधीश श्रीमती. ताकभोरे मैडम यांनी सदरहू कायद्याची विस्तृत माहिती दिली. तसेच न्यायाधीश श्रीमती.अनस्सारी मैडम यांनी महिलांना लहानपणी पासून तर जीवनाच्या शेवटी पर्यंत महिलांचं नातेसंबंध यांवर विस्तृत कविता सादर केली, तर न्यायाधीश श्रीमती. अदोने मैडम यांनी महिला नारीशक्ती यावर कवितासंग्रह विषद केला. तर न्यायाधीश श्रीमती. राय मैडम यांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणात समाजातील महिलांचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी. अनुराधा देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमातील आभारप्रदर्शन ॲड. अनिता ठाकरे यांनी केले. कार्यक्रमांत बहुसंख्येने महिला कर्मचारी, न्यायाधीश, तसेच महिला वकील मंडळी उपस्थित होते. सदरहू कार्यक्रमाला सहकार्य न्यायाधीश श्रीमान.देशमूख साहेब तसेच वर्धा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुशांत राउत सर यांनी सहकार्य केले.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!