वर्ध्याच्या वायगाव येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या
क्राईम प्रतिनिधी / देवळी :
- तालुक्यातील वायगाव येथील भांडणांमध्ये मध्यस्थी करण्यास आलेल्या पान पट्टी चालक युवकाला भोसकून ठार केल्याची घटना वायगाव निपाणी येथे बस स्थानक परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी दरम्यान घडली.
चेतन विष्णू घोडमारे वय 22 असे मृत युवकाचे नाव असून देवळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक चेतन घोडमारे याचा बस स्थानक परिसरात पानठेला होता. पानठेल्या समोर एका तरुणाने अंड्याची बंडी लावली होती. अंड्याच्या बंडीवर सावंगी सिख बेड्या वरील तीन युवक या ठिकाणी आले होते. दरम्यान अंडे घेतल्यानंतर पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला.ड नशेत असलेल्या तीन युवकांनी बंडी चालकाला मारहाण करणे सुरू केली .
हे दिसताच पानठेला चालक चेतन घोडमारे मध्यस्थी करण्यासाठी गेला त्यावेळी त्याने तीन युवकाला पैसे देण्यासाठी सांगितले .त्यानंतर या आरोपींनी चेतन सोबत वाद घातला त्यातील एका आरोपीने गुप्ती काढून चेतन वर चाकूने वार केले.
त्यात चेतन गंभीर जखमी होऊन खाली पडला .पोलीस चौकी चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तीन आरोपींना ताब्यात घेतले. जखमी चेतनला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. करण सिंग बबलू सिंग आणि चरण सिंग अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत .रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे.