वर्ध्यातील एकाचवेळी १५ गुन्हेगार केले तडीपार
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा:
पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली असून वर्धा उपविभागातील तब्बल १५ गुन्हेगारांना एकाचवेळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश एसडीओ सुरेश बगळे यांनी पारित केला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण व्हावा, शहरात शांतता निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे गुन्हेगारांना पळताभूई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यकत केले आहे.शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. नववर्षाच्या पूर्व संध्येला एसडीपीओ पियूष जगताप यांनी विविध पोलीस ठाण्यांतील सराईत गुन्हेगारांची कुंडली जमा करुन तडीपारिचा प्रस्ताव एसडीओ सुरेश बगळे यांच्याकडे पाठविला. एसडीओंनी सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर शरीरविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत तसेच दारुविक्रीचेही गुन्हे दाखल आहेत हे विशेष.
अशी आहेत हद्दपार गुन्हेगारांची नावे
वर्धा उपविभागातून विशाल चंदू कुराडे रा. वडार वस्ती आर्वी नाका, मंगेश सुरेश झांबरे रा. गोंडप्लॉट, पवन हरिचंद्र चावरे रा. स्वीपर मोहल्ला, सुरेश उर्फ दया दुर्गाप्रसाद यादव रा. शांतीनगर, अमोल उर्फ अमित लक्ष्मण लाखे रा.पवनार, सुनिल गोपीचंद मेहुणे रा. वडगाव खुर्द, चेतन अवधूत गोंडाणे रा. कोथीवाडा, चेतन अनिल गावंडे रा. जंगलापूर, रोशन शेख ईमाम शेखरा. जुनापाणी चौक, दिनेश निलकंठ लोहकरे रा. बहुजन नगर, लियाकत अली निसार अली रा.आनंदनगर, सचिन बाबाराव सातघरे रा. पवनार, वैभव रमेश ठवरे रा. सुभाषनगर पुलगाव तसेच किरण विष्णू घाेडमारे रा. वायगाव आणि रत्नाकर रंगराव रेवतकर रा. वायगाव अशा १५ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले.