वर्ध्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी उपासक व उपासिकांनी पुतळ्याजवळ लावलेल्या मोबबत्तीच्या मोमने लोकांची अपघात होऊन जिवहानी होवु नये याकरिता भीम टायगर सेनेने राबविले स्वच्छता अभियान
शहर प्रतिनिधी / वर्धा :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी वर्धा शहरातील सर्व बौद्ध अनुयायांनी पुतळ्याजवळ लावलेल्या मेणबत्तीच्या मोमने रस्त्या वर असून पडून असून सुद्धा नगरपरिषद ने दोन दिवस तेथील कचरा साफ केला नाही, नगर परिषद प्रशासन झोपेत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊन जीवितहानी होवु नये यासाठी अखेर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, बाबा बडगे, अमित गजभिये, सौरभ हातोले, पिंटू सवाई, आशीफ शाह, अहेमद पठाण, कन्हैया उईके, प्रकाश कोरडे, अंकुश मुंजेवार, आदर्श सांगोले, विनोद सोलंकी, मयुर ढेकले, सुदेश मेश्राम, सोनु सहारे ईत्यादी कार्यकर्तांनी पुतळ्याजवळील साफसफाई केली परंतु तिथे प्रत्यक्षात उभे असलेले नगर परिषद व पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांना त्या गोष्टीची काहीही जाणीव नसून प्रशासन झोपी गेलेले आहे असे दिसून येत होते.