वर्ध्यातील तत्कालीन समाज कल्याण अधिकारी पवनकुमार चव्हाण यांची मुंबई येथे जबाबदार पदावर नियुक्ती.
मुंबई / शहर प्रतिनिधी :
वर्धा जिल्ह्यात कार्यरत तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी पवन कुमार चव्हाण यांना येथील काही असामाजिक तत्त्वाचा लोकांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. जो घोटाळा चव्हाण यांनी केला नाही त्या विषयाचा बाऊ करून सदर अधिकाऱ्याला प्रचंड त्रास देण्यात आला. परंतु सत्याचा विजय हा अन्याय, अत्याचार संघर्ष करून मिळतो. याची प्रचिती पवन कुमार चव्हाण यांना आली.
तत्कालीन जिल्हा सरकारी कामगार पदावर असताना येथील भ्रष्टाचारी अधिकारी व काही कामगार संघटनेला हाताशी धरून वर्ध्यातील प्रसिद्ध भामटा यशवंता नामदेव झाडे व त्याच्या सहकाऱ्यांनी पवन कुमार चव्हाण या अधिकाऱ्यावर खोटे आरोप लावून त्यांचे निलंबन केले. परंतु सरकारी कामगार अधिकारी चव्हाण हे सत्य असल्यामुळे त्यांनी निलंबन रद्द करण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटमध्ये धाव घेतली. तसेच त्यांच्यावर लावलेल्या खोट्या गुन्ह्यात मा. उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही ठिकाणी पवन कुमार चव्हाण यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने पवन कुमार चव्हाण यांची मुंबई बांद्रा ( कुर्ला ) या कामगार कार्यालयात कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती देऊन जबाबदारीचे कामे शासनाने सोपवली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी यांचा प्रश्न सोडविणे तसेच बिडी कामगार, सिंगार कामगार,
आंतरराज्य स्थलांतरित कामगार पत्रकार व पत्रकारितेत कर्मचारी या सर्व कामगारांचे एकूण प्रश्न मार्गी लावण्याचे कामकाज पाहण्याची जबाबदारी कामगार विभागाने पवनकुमार चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यांना जबाबदारीचे पद मिळाल्यामुळे त्यांचे मूळ गाव उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील नागरिकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.
साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने पवनकुमार चव्हाण यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.