वर्ध्यातील युवा भारत परिषद तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी वर्धा :
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामागे त्यांचे वडील शहाजी व आई जिजामाता यांची प्रेरणा होती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वर्ध्यातील भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, पंकज लभाने
हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विविध विविध मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात करण्यात आली व भव्य महाप्रसाद सुद्धा देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अंशुल भोसले, युवराज गोलर, सुशांत जिवतोडे , अभिषेक सिंग, शंतनू डुकरे, वैभव ठाकरे, अनुराग दुबे, गोपाल धांदे , सुशांत काकडे, साहिल दौंड, अनिकेत मेंढे , अक्षय लोखंडे आदींनी केले होते.