वर्ध्यात अमरावतीच्या हिंसाचारावर भाजपाचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी / वर्धा :
अमरावती मध्ये रजा अकादमी सारखी संस्था विना परवाना मोर्चा काढून हिंदूंच्या दुकानावर हल्ला केला त्याची तोडफोड केली. हिंसाचार शहरात केला याला उत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी हिंदूंनी काढलेल्या मोर्चावर या आघाडी सरकारने कारवाई केली. भाजपाच्या माजी मंत्र्यांवर गुन्हे दाखल केले, हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, आणि हिंसाचार करणाऱ्या या संस्थेला तात्काळ काळा यादीत टाकुन तिच्यावर प्रतिबंध लावण्यात यावा या मागणीला घेऊन वर्धा जिल्हा भाजपा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय पुढे धरणे आंदोलन देण्यात आले, यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्ता तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते, त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
काँग्रेस पक्षाचा एकच अजेंडा जाती-जातीत व धर्मा धर्मात झगडा लावायचा आणि राज्य करायचं गांधीजीच्या जयंतीला यांचा एकही नेता बापू कुटी ची येत नाही ही शोकांतिका आहे. आमच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर लावलेले गुन्हे परत घ्या आणि झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केले असे रामदास तडस म्हणाले.