वर्ध्यात पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले
क्राईम प्रतिनिधी / वर्धा :
संशयी वृत्तीच्या पत्नीने थेट आपल्या पतीला गावातीलच एका 14 वर्षीय मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करावयास लावल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून आरोपी दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोटोडा (बेनोडा) येथे अल्पवयीन पीडिता ही घरी एकटी हजर असताना आरोपी महिलेने तिला आपल्या घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी येताच आरोपी महिलेने तिला तू माझ्या पतीसोबत लग्न कर, असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून ती घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पुरुषाने पीडिता ही एकटी असल्याचे हेरून तिच्यावर जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर आरोपी पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावले.