वर्षा गवारले दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 ने सन्मानित…

0

🔥कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा, अमरावती यांचा उपक्रम.

सिंदी (रेल्वे) -/ कला जीवन बहुउद्देशीय संस्था ढगा, ता. वरुड, जिल्हा अमरावती येथे दरवर्षीच समाज विधायक व आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करीत असते. त्यामुळे यावर्षी सुद्धा कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा, जिल्हा अमरावती तथा रोटरी क्लब, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कला, शिक्षण, समाजसेवा, उद्योग, युवाकल्याण, कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते झालेले असून प्रमुख उपस्थितांमध्ये कलाजीवन बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालख, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक पियुष भोंडे हे मान्यवर उपस्थित होते.
हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 14 जून 2024 रोजी पुण्याई सभागृह पुणे येथे संपन्न झाला. याकरिता वर्षा गवारले सहाय्यक शिक्षिका केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा, ता. सेलू येथे २४ वर्षापासून कार्यरत असलेल्या व आपल्या विद्यार्थ्यांना विविध सहशालेय उपक्रमाच्या मार्फत तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरापर्यंत पोहोचवण्यास मार्गदर्शक म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षिका यांची निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय हरित सेना या विषयांतर्गत विविध कृतीशील उपक्रमातून पर्यावरण विषयक जनजागृती करणाऱ्या उपक्रमांचे आयोजनही त्या करीत असतात. सांस्कृतिक उपक्रमांच्या मार्फत आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगीच्या सुप्त गुणांना वाव देण्यास विविध संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्काराच्या निवडीचे श्रेय वर्षा गवारले यांनी शाळेचे प्राचार्य विलास येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर व समस्त शिक्षक बंधू भगिनी तथा नगर शिक्षण मंडळास दिलेले आहे.

दिनेश घोडमारे साहसिक news -/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!