🔥वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गाईचा मृत्यू तर पाच गाई लापता,साहुर सर्कल मध्ये जंगली प्राण्यांची दहशत.
साहुर -/ आष्टी तालुक्यातील साहूर सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा त्रास असून शेतकरी पशुपालक त्रस्त झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जंगली जनावरे शेतकऱ्यांचा तसेच पाळीव प्राण्यांचा बळी घेत आहे किशोर हिवरे यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत त्यामध्ये एका गाईला मौजा बोरखेडी येते वाघाने जखमी केले होते तीन दिवस गेल्यानंतर त्या गाईचा दुर्दैवी अंत झाला तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गाई चरण्याकरता गेल्या असता त्या अजून पर्यंत घरी आल्या नाहीत त्यामुळे या गाईंचा घात सुद्धा वाघानेच केला असल्याची शाश्वती शेतकऱ्यांना तसेच पाळीव पशुपालकांना आहेत शेतामध्ये राब राब राबणारा शेतकरी जंगली डुकरांमुळे त्रस्त झाला तर पशुपालक वाघांमुळे त्रस्त झाले आहेत तरीही वन विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत असून याचा उद्रेक होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे कारण शेतकरी हा नापिकीमुळे आधीच अडचणीत सापडलेला आहे त्यामध्ये जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांचे जगणे कठीण करून टाकलेले आहेत त्यामुळे आता शेतकरी टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले अनेक पशुपालक आपल्या गाईचा शोध घेत आहेत परंतु अजुनही शोध लागला नाही यामध्ये कला कुरवाडे ,प्रवीण रत्नपारखी रामदास नाखले संजय कोहरे गोपाळ भालेराव किशोर हिवरे इत्यादी अनेक पशुपालकांचा समावेश आहे हे विशेष.