वाडी येथे वीज तोडणी विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन
मुक्ताईनगर / पंकज तायडे
मुक्ताईनगर येथे आज वाढीव वीज बिल आणि वीज तोडणी विरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे मुक्ताईनगर तहसीलवर वीज बिलांची होळी विज बिल तोडणे थांबवा अन्यथा येत्या 20 तारखेला जेलभरो करणार, रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, यांचा विज महावितरण कंपनी आणि प्रशासनाला इशारा दिला.
महाराष्ट्रभरात वीज वितरण कंपनीने वीज तोडणी चा सपाटा चालू केला आहे .लोकांना अंदाजे आणि वाढीव बिल द्यायची आणि थकित बिलापोटी लोकांची वीज कनेक्शन कट करायचे असे काम प्रशासनाने सुरू केलेला आहे आधीच कोरणा मध्ये रोजगार नव्हता आता कुठे सामान्यांचा जनजीवन रुळावर येत आहे महावितरण कंपनी याचा विचार न करता तसेच शेतकऱ्यांना सुद्धा कपाशी मध्ये मोठा फटका बसला आहे आता शेतकरी दुसरा हंगाम गहू हरभरा पेरणीची तयारी करत आहे असे असताना महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज बिल भरा नाही तर तात्काळ वीज कनेक्शन कट करण्याची दमबाजी करत आहे याविरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे आज तहसील कार्यालयावर विज बिल जलाव आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे यांनी महावितरण कंपनीला वीज कनेक्शन कट करू नका अन्यथा येत्या वीस तारखेला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलन करतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर ,विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे, सिद्धार्थ हिरोळे, सुपडा हिरोळे, दिपक बोदडे ,अमोल बोदडे, भगवान कवरे ,मजीद बागवान, हमीद चौधरी , सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर विवेक सोनवणे, शेख अजगर, रमेश बोदडे, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.