🔥वानाडोंगरी नगर परिषदेत जुना मुख्याधिकारीच? फलक बदलायलाही ‘खास’कारण?
वानाडोंगरी -/नगर परिषदेत प्रशासनातील ढिसाळपणा आणि संशयास्पद कारभार उघड झाला आहे. भारत नंदनवार यांनी सहा एप्रिल दोन हजार चोवीस ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर २६ मार्च २०२५ पासून राहुल परिहार यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.पण धक्कादायक म्हणजे, साडेचार महिने उलटूनही मुख्य प्रवेशद्वारावर “भारत नंदनवार – प्रशासक तथा मुख्याधिकारी” असा फलक अजूनही लावलेला आहे. यामुळे कार्यालयात येणारे नागरिक आजही नंदनवार यांनाच मुख्याधिकारी समजत आहेत.फलक बदलणे इतकं अवघड आहे का, की कुणाच्या ‘सोयीसाठी’ जाणूनबुजून हा गोंधळ ठेवला जातोय ? प्रशासनातील अशा निष्क्रियतेमागे आर्थिक किंवा राजकीय हेतू असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विद्यमान मुख्याधिकारी राहुल परिहार यांची भूमिका आणि जबाबदारीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(सरळ प्रश्न — वानाडोंगरी नगर परिषद कोण चालवतंय? विद्यमान अधिकारी की ‘नावापुरते’ माजी अधिकारी?)