🔥हिच ती वानाडोंगरी नगर परिषद ची मुख्याधिकारी राहुल परिहार यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाणे तक्रार घेतली.
🔥संबंधित अधिकारी यांना शहाकार गृह निर्माण सोसायटीशी साठ गाठ करणे भोवणार.
हिंगणा -/ वाणाडोंगरीतील शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीला वानाडोंगरी नगर परिषद मुख्याधिकारी व अधिकारी बेकायदेशीर ले आऊट मध्ये लाभ पोहोचवीत असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन ढाकूलकर यांनी तक्रार सादर करून नमूद केले की राहूल परिहार मुख्याधिकारी , श्रीमती प्राची लांजेवार प्रशासकीय अधिकारी , कु. दिपाली राजगे रचना विभाग हे नगर परिषद वानाडोंगरी येथील अधिकारी असून सतीश भाऊराव शहाकार हा गावातील माजी सरपंच व माजी नगराध्यक्ष यांचा पती असून त्याच बरोबर नागपूर मनपा कार्यक्षेत्रात नोंद असलेल्या शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीचा पदाधिकारी आहेत. तसेच गैर अर्जदार राजू सेवकराम शहाकार, अविनाश सेवकराम शहाकार हे दोघे शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व. सेवकराम दिनबाजी शहाकार तसेच खसरा नंबर ३५० जमिनीत ४२० चा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे मूल आहेत. या बाबत माहिती अशी की सतीश शहाकार , राजू शहाकार , अविनाश शहाकार यांनी नगर परिषद मुख्यराधिकारी राहुल परिहार , व प्राची लांजेवार, दिपाली राजगे यांचे सोबत साठ गाठ करून मौजा वानाडोंगरी प.ह.नं.४६ ख. नं.३५० आराजी ०.५४ हे.आर. ही जमीन बेकायदेशीर पने हडपून म्हणजेच मनपा कार्य क्षेत्रातील गृह निर्माण सोसायटी असताना वानाडोंगरी मधील जमीन खरेदी विक्री करू शकत नाही , व त्या ठिकाणी भूखंड टाकून विक्री करू शकत नाही असे असताना सुद्धा ०.५४ हे.आर. जमिनीत १५० प्लॉट टाकल्या गेले ही बाब माहिती अधिकारात प्राप्त माहितीच्या आधारे उघड झाली व नगर परिषद कार्यालय मधील अधिकारी यांच्याशी साठ गाठ करून व गैर अर्जदार सतीश शहाकार यांनी आपल्या सरपंच , सदस्य व पत्नीच्या नगराध्यक्ष काळात पदाचा दुरुपयोग करून नगर परिषद मधील अधिकारी कर्मचारी यांचेशी साठ गाठ करून व त्यांना ते नगर परिषद क्षेत्रात करीत असलेल्या बेकायदेशीर कामा बाबत राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कडे तक्रार करून त्यांना निलंबित करण्याचा व ठोस कारवाईचा धाक दाखवून व आपले बेकायदेशीर पणे ले आऊट टाकून सदर मालमत्ता आज रोजी सुद्धा शहाकार गृह निर्माण सोसायटी नावाने महसूल विभागात नोंद नसताना नियमा पेक्षा जास्त भूखंड तयार करून भूखंड विक्री करून नगर परिषद मध्ये मालमत्ता नोंद केल्या व मालमत्ता क्रमांक प्राप्त केला व लाखो करोडो रुपयांचा घोळ करून भ्रष्टाचार केला आहे. तसेच त्यांचेवर अंमलबजावणी संचालनालय (ई.डी ) कडे व इतर विभागात तक्रारदार यांचे कडून तक्रारी दाखल झाल्याच्या बातम्या शहरातील लोकप्रिय दैनिकात प्रकाशित झाल्या असताना सुद्धा नगर परिषद मधील मुख्याधिकारी व अधिकारी यांनी या बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विषयांकित सदर मालमत्तेची व गैर अर्जदार यांच्या मौजा वानाडोंगरी व वागधरा इसासनी व इतर बेकायदेशीर मालमत्तेचा सुद्धा कसून शोध घेऊन दोषी आढळल्यास तत्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करावे या आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन. ढाकुलकर यांनी पोलीस अधीक्षक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग नागपूर व नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे तसेच पोलीस विभागात व विविध विभागात तक्रार सादर केली आहेत. व तत्काळ कारवाईची मागणी केली आहेत. (क्रमशः)