🔥वानाडोंगरी मधील टँकर द्वारे पाणीपुरवठा धारकाची दिव्यांग व्यक्तीने केली जिल्हाधिकारी कडे तक्रार.
हिंगणा -/वानाडोंगरी नगर परिषद शहरात जन्मा पासून एक ७९ टक्के प्रमाणपत्र असलेला दिव्यांग व्यक्ती असून वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात मागील १५ वर्षापासून आपल्या परिवारा सोबत राहत आहेत. दिनांक १८/०६/२०२५ बुधवार रोजी दुपारी. १२ वाजता तो राहत असलेल्या राजीवनगर परिसरात नगर परिषदे वानाडोंगरीच्या टँकर क्रमांक MH 35 G – 4703 द्वारे नागरिकांच्या घरा समोर ठेवलेल्या ड्रम मध्ये पाणी पुरवठा सुरू होता.व पाणी पुरवठा करणारे ड्रायव्हर व कर्मचारी दारूच्या नशेत होते व जे नागरिक त्यांना एका ड्रम चे २० रुपये देत होते. त्यांना आधी दिवसाच पाणी देत होते. व या बाबत दिव्यांग असलेल्या विनोद शाव यांनी विचारणा केली तर हो आम्ही पैसे घेतो तुम्हाला आम्ही पैसे घेतल्याचा फोटो काढायचा असेल तर हे बघा २० रुपये काढा आमचा फोटो असे म्हणताच विनोदने त्यांचा फोटो काढला व काही नागरिकांना रात्री ११ किंवा १२ वाजता पाणी देतो म्हणून टाळा टाळ करतात व मानसिक त्रास देतात. तसेही नगर परिषद वानाडोंगरी मध्ये दरवर्षी पाणी टंचाई दरम्यान टँकर द्वारे मोठा भ्रष्टाचार होत असतात. या बाबत अनेक नागरिकांच्या प्रशासना कडे तक्रारी दाखल आहेत. पण चौकशी करून कारवाई करणारे अधिकारी सुद्धा आपला भ्रष्टाचाराचा हिस्सा घेऊन तक्रारीवर कारवाई करीत नाही. त्यामुळे अनेक नागरिक शरीराने धूष्ठपूष्ठ राहून व शिक्षित राहून सुद्धा तक्रार करीत नाही. असे मत तक्रारदार यांनी नमूद केले व तत्काळ दखल घ्यावी घ्याल ही आशा बाळगतो व आपण केलेल्या कारवाईची मला आपण माझ्या पत्यावर पूर्ण लेखनीशी माहिती द्याल मला माझ्या तक्रार अर्जावर काय कारवाई झाली या करिता माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर करण्याची वेळ येऊ देऊ नका हीच पुनच्छ आपणा कडून आशा बाळगतो व तसेच तक्रारदार विनोद गणेश शाव यांनी मा. विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर,डॉ. विपिन ईटनकर जिल्हाधिकारी नागपूर ,उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीन,सचिन कुमावत तहसीलदार हिंगणा,पोलिस अधीक्षक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग नागपूर,चंद्रशेखर बावनकुळे महसूल व पालकमंत्री नागपूर जिल्हा,नगर विकास मंत्रालय मुंबई यांना सुद्धा इ मेल द्वारे तक्रार सादर केली.