वायफडच्या सरपंचाला मारहाण; दगडाने फोडले डोके
वर्धा : गावात सुरू असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना सरपंचानं संबंधितांना हटकलं. यावरून सरपंचाला शिवीगाळ करीत दगडाने डोक्यावर मारहाण करण्यात आली. यात सरपंचाचं डोकं फोडून जखमी झाली. ही घटना वायफड येथे घडलीय. वायफड येथील विजय रामदास राऊत वय 27असं जखमी सरपंचाचं नाव आहे. गावात रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला कंत्राटदारानं ठेवली होती. आरोपी अरुण बावणे हा रस्त्याच्या कडेला ठेवलेली वाळू चोरून नेत होता. सरपंच विजय राऊत यांना अरुण बावणे हा वाळू नेत असल्याचे दिसले. त्यामुळं राऊत यांनी बावणे यास हटकले. यावेळी बावणे याने शिवीगाळ करून प्लास्टिक टोपल्याने तसेच दगडाने राऊत यांच्या डोक्यावर मारहाण केली.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
यात सरपंच राऊत जखमी झाले. घटनेची तक्रार सरपंचाने पुलगाव पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोबतच आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा पुलगाव पोलिसांनी केली असल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील सरपंचाला मारहाण करण्यात आली. सरपंचाचे दगडाने डोकं फोडण्यात आलं. पुलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
समाजकंटकांमुळं गावाचं नुकसान
या घटनेत सरंपच आपले कर्तव्य बजावत होते. पण, गावात काही समाजकंटक असतात. ते सरकारची संपत्ती म्हणजे सार्वजनिक समजतात. यातून अशा घटना घडतात. गावात सरपंचाला मान दिला जातो. गावाचा विकास हा सरपंचावर अवलंबून असतो. मात्र, अशा समाटकंटकामुळं गावाचं नुकसान होतं. त्यामुळं गावात पुढारीपण करणं काही जण टाळतात. यात सरपंचाचं काही नुकसान झालं नसतं. मात्र, गावाचा पुढारी म्हणून संबंधिताला टोकणं आवश्यक होतं. अन्यथा सार्वजनिक वस्तूंचा बट्टाबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.