वर्धा-/आष्टी तालुक्यातील लहान आर्वी येथे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.अवकाळी पाऊस सध्या सर्वीकडे वारंवार येत असल्याने हवा व पाऊस आला की,लहान आर्वी फीडरवरील बत्ती गोल होने हे सातत्याचेच झाले आहे.येथे अंतोरा डीसी मधुन विद्युत पुरवठा सुरू आहे.अंतोरा डीसी मध्ये एकुण तीन फीडर आहे.अंतोरा,बेलोरा आणि लहान आर्वी असे एकुण तीन फीडर कार्यरत आहे.लहान आर्वी फीडरवर सर्वात जास्त घरगुती कनेक्शन आणि शेती कनेक्शन आहे.लहान आर्वी फिडरवर लहान आर्वी , लिंगापुर , जैतापुर आणि एनाडा , पिलापुर तसेच पोरगव्हाण , पंचाळा अशी एकुण सात गावे आहेत.तसेच विद्युत लाईनचा पुरवठा सुध्दा मोठ्या प्रमाणात लांब गेला आहे.लहान आर्वी राम मंदिर पासुन एकीकडे एनाडा-पिलापुर आणि दुसरीकडे पोरगव्हाण-पंचाळा पर्यंत विद्युत पुरवठा आहे. या चारही गावांचा विद्युत पुरवठा हा जंगलातुन गेला आहे. त्यामुळे बाराही महिने थोडी जरी हवा आली तर लहान आर्वी येथील विद्युत पुरवठा खंडित होतों.याला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे महावितरण विभागाने जबाबदारीने आणि गांभीर्यपुर्वक ट्री कटींग करुन न घेने. आज पर्यंत चा इतिहास आहे की,अंतोरा डीसी मध्ये कार्यरत असलेल्यांपैकी अक्षय बनसोडे सारख्या अभियंताचा अपवाद वगळता आजपर्यंत अनेक अभियंत्यांनी जबाबदारीने ट्री कटींग केलीच नाही.ट्री कटींगचे नावावर हजारो रुपये काढल्या जातात मात्र लहान आर्वी फिडरचा विद्युत पुरवठा खंडित होने काही थांबले नाही.ट्री कटींग कशीतरी थातुरमातुर केली जातो आणि थोडी हलक्यात हवा व थोडा हलक्यात पाऊस आला की, लहान आर्वी फीडरचा विद्युत पुरवठा लगेच खंडित होतो.महवितरण जबाबदारीने ट्री कटींग करीत नसल्याने त्याच्या झळा मात्र सर्व सामान्य नागरीकांना सोसाव्या लागत आहे. एक दिवस उशीराने विद्युत देयके भरतो म्हटलं तर महावितरणचे कर्मचारी दरवाजात उभे राहतात. ही त्यांची जबाबदारी सुध्दा आहे.परंतु तेवढी सेवा मात्र महावितरण विभागाने द्यायलाच पाहिजे असे सर्व सामान्य नागरीकांचे मत आहे.सध्याचे स्थीतीत आता अंतोरा डीसी मध्ये ट्री कटींग चे काम सुरू असल्याचे महावितरणचे कर्मचारी गावागावात सांगत आहे.आणि ट्री कटींगचे नावावर सहा-सहा तास विद्युत पुरवठा बंद ठेऊन ट्री कटींग करने सुरू आहे.मात्र पुढे मान्सुन सुरू झाल्यावर थोडी हवा आली की, ट्री कटींगचे आऊटपुट झिरो दिसुन येणार.म्हणजेच विद्युत पुरवठा लगेच खंडीत होणे आहे.यावर वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष देने गरजेचं आहे. इतकेच नव्हेतर जंगलातुन गेलेल्या लाईनवर ट्री कटींग झाले की नाही याचं व्हेरीफिकेशन सुद्धा वरीष्ठ कार्यालया कडुन होने गरजेचं आहे.