🔥विजयगोपाल येथे भारतिय डाक विभागाच्या विविध योजनांची जनजागृती.देवळी,विजयगोपाल -/येथील ग्रामपंचायत कार्यालयच्या आवारात अधिक्षक डाक विभाग, वर्धा तथा सा.अधिक्षक उपविभाग आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 21/01/2026 रोजी विजयगोपाल पोस्ट ऑफीस तर्फे ग्रमपंचायत विजयगोपाल येथे ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) तसेच भारतिय डाक विभागाच्या विविध योजनेची माहीती प्रचारीत करनारे अतिशय उपयुक्त मेळाव्याचे आयोजन करन्यात आले होते. नागरीकांना विवीध योजनांची माहीती मीळावी व बचतीची सवय लागावी ह्या उद्देशाने मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यामध्ये विजयगोपाल ग्रामपंच्यायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते व नागरीकांनी मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मेळाव्याचे आकर्षण “कमी प्रीमियम उच्च बोनस, ” विजयगोपाल शाखा डाकघराच्या वतीने नागरीकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.