विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतात संशोधक ,शास्त्रज्ञ निर्माण व्हावे…..

0

🔥विद्यार्थ्याच्या श्वासत विकासासाठी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करणे, ही काळाची गरज.

🔥नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन.

 आर्वी -/ साप्रंत काळात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असुन विज्ञानाच्या भरीव सहकार्यामुळे, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. विज्ञानाच्या साहाय्याने या भूतलावर ,पुथ्वीतलावर अनेक नानाविध शोध लावले असुन अथांग ब्रम्हाडांचा शोध विज्ञानाच्या साहाय्याने लागला आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त व नैसर्गिक कलागुणांना चालना देण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी सतत जिज्ञासा वुत्तीचा अथांग परिचय देऊन, आजचे विद्यार्थी हे भविष्यातील उद्याचे संशोधक कसे निर्माण होईल, यासाठी ध्येयवेड्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अथांग महासागरात पोहता यावे यासाठी त्याच्या कल्पकशक्तिला व जिज्ञासू वुत्तीला सदैव चालना दिली पाहिजे, असे प्रतिपादन आर्वीचे नवनिर्वाचित आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी व्यक्त केले आहेत.
.कुषक कन्या विद्यालय आर्वी येथे आर्वी पंचायत समिती शिक्षण विभाग आर्वी व कुषक कन्या विद्यालय आर्वी यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनाच्या सोहळ्यात प्रमुख उदघाटक म्हणून ते विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करीत होते.
यावेळी व्यासपीठावर आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा.श्रीमती सुनिताताई मरसकोल्हे,गटशिक्षणाधिकारी श्री सुरेश पारडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पदमाताई तायडे, कुषक शिक्षण संस्थेचे आर्वी येथील कोषाध्यक्ष श्री संदिपभाऊ काळे,कुषक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनघा कदम,पदमजा देशमुख, वाळके मँडम, तसेच केन्द्र प्रमुख संजय कोहचाडे,प्रमोद पांडे,विलास तराळे, विजय लोणारे आदि मान्यवर विराजमान होते.
पुढे मार्गदर्शन करतांना आमदार वानखेडे यांनी सांगितले की भारतासारख्या विशाल लोकशाही देशात अनेक विद्यार्थी ज्ञानाच्या व विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असुन त्यांना भविष्याची योग्य व समर्पक दिशा देण्यासाठी शिक्षकांनी काळाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन केल्यास नक्कीच आजचा विद्यार्थी भविष्यात संशोधक व शास्रज्ञ झाल्याशिवाय राहणार नाहीत, त्यासाठी विज्ञान हे मानवाच्या श्वासत विकासासाठी हाताळले तर जगाचा सर्वागीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना विज्ञानाचा वापर विध्वंसक गोष्टी साठी न होता तो मानवाच्या यथार्थ कल्याणासाठी झाल्यास जगात शांतता व सौहार्द प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाहीत, त्यासाठी विद्यार्थ्यांनमध्ये नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, दयाळूपणा,परोपकार, त्याग या भावना रूजविण्यासाठी शिक्षकांनी विज्ञानाच्या साहाय्याने नैतिक मूल्य शिक्षण प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी नैतिक मूल्य योग्य पणे जीवनात रुजविली तर विज्ञानाचा उपयोग मानवाच्या श्वासत व सर्वागीण विकासासाठी केला जावू शकतो, असेही त्यांनी सांगितले तसेच विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रतिकुती,माँडेल तयार करणाऱ्या पुरस्कार प्राप्त शाळेला आमदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. याआधी आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा.श्रीमती सुनिताताई मरसकोल्हे, आर्वी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुरेश पारडे साहेब,कुषक शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री संदीप काळे, मुख्याध्यापिका सौ अनघा कदम यांनी सुध्दा विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विषद केले.
या विज्ञान प्रदर्शनात आर्वी तालुक्यातील २०९शाळांनी भाग घेवुन आपल्या प्रतिकुती, प्रयोग, माँडेल विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला.
विज्ञान प्रदर्शनाचे संचालन श्री आशीष देशमुख सर,प्रास्ताविक सौ.अनघाताई कदम मँडम तर आभारप्रदर्शन सौ.वनश्री कडू मँडम यांनी केले.
आयोजनासाठी मनोहर पचारे,अनंत भामकर,निता राऊत, मंजुषा राऊत,उमेश फुलबंरकर,राकेश ढोले, दिनेश शेळके, योगिता जत्तेवार,वनश्री कडू,उज्वला झटाले,प्रमिला वरकडे,मंगला बेलसरे संगिता तेलगोटे,महेश ढवळे,लक्ष्मण शेळके, मनोज गाडेकर,संतोष खांडेकर, मारोती ओंकार, ज्योत्सना चारडे,ऋतूजा टोपले,कोमल पवार, योगिता कोटेवार, संध्याताई पायले,दयमंती भोंगाडे,सचिन खोडके, मिलिंद आसोडे,सरताज पठाण, सचिन टरके,देविता पाटणे, सुनिता राजनकर,मंगेश कठाणे, सुनील शंभरकर, उज्वला अभिलकर,इत्यादि शिक्षकांनी अथक प्रत्यन्त केले.

राजू डोंगरे साहसिक NEWS -/24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!