हिंगणघाट -/ शेतकरी विरोधी नीती अवलंबणाऱ्या व तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलणाऱ्या विद्यमान युती सरकारला महाराष्ट्रात सत्तेत राहण्याचा आता अधिकार नसून त्यांना सत्तेवरून खाली खेचा व महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन शरद पवार यांनी केले
हिंगणघाट येथे गोकुलधाम मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस(शप) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे महाविकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस(शप) चे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार अतुल नामदेवराव वांदीले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार वसंतराव बोंडे, सुरेश देशमुख व प्रकाश गजभिये तसेच जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, नितेश तराळे गुरुजी,आपचे अनिल जवादे,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुछ राजेंद्र खूपसरे,काँग्रेसचे माजी न.प, अध्यक्ष पंढरीनाथ कापसे,मोहम्मद रफीक पत्रकार शेख सरफु, इत्यादींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील सत्ताधार्यांवर व महाराष्ट्रातील युती शासनावर घणाघाती टीका केली.आम्ही केंद्रात सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांची ७० हजार कोटीची कर्जमाफी करून त्यांना कर्ज मुक्त केले.मागील दहा वर्षात केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवले.उद्योगपती धार्जिण्या आयात व निर्यात धोरणामुळे शेतमालाचे भाव गडगडले.अखेर लोकसभेच्या काही महिण्यांपुर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर सत्ता बसवू शकला नाही. त्यांना दोन कुबड्यांचा आधार घ्यावाच लागला.तिच स्थिती आता महाराष्ट्राची आहे. शेतकरी विरोधी धोरणासोबतच महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे.आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असताना आता मात्र महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे.येथे कष्ट करणाऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील युती सरकारला त्यांची योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे.त्यांचा आत्मविश्वास हरपल्यामुळेच ते आता विविध योजनांचे आमिश दाखवत आहेत असे पुढे बोलताना शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून आघाडीने महाराष्ट्रातील जनतेला ज्या पाच गॅरंट्या दिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणातुन विद्यमान सरकारने मागील दोन वर्षात फोडाफोडीचे राजकारण करुन राज्य अधोगतीला नेल्याचा आरोप केला.मंच संचालन विजय तामगाडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र खुपसरे यांनी मानले.