सेवाग्राम -/ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यांचा दैदिप्यमान इतिहास हा समजावून घेणे गरजेचे आहे.विद्यार्थी हा एका पिढीचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने छत्रपती शिवाजीराजेंचा खरा इतिहास समजावून घेणे गरजेचे असल्याचे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धैत सहभागी झालेल्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सेवाग्राम, यशवंत महाविद्यालय वर्धा आणि यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सेवाग्राम यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली.उद्घाटक म्हणून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख तर अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालय वर्धा चे प्राचार्य डॉ गिरीश ठाकरे तर स्पर्धा संयोजक प्रा.उमाकांत डुकरे, प्ररिक्षक उज्वला इंगळे,अभिता शिंदे, शैलजा साळुंखे व प्रा.नरेश सोनटक्के इ.उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षण महर्षी बापूराव जी देशमुख यांच्या तैलचित्रांचे विधीवत पूजन व हारार्पन करण्यात आले.
प्राचार्य गिरीश ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वसमावेशक इतिहास समजून घेणं गरजेचं आहे.आजही त्यांच्या व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास विद्यार्थी दशेत आपण केला पाहिजे असे सांगून अशा स्पर्धांचे आयोजन झाले पाहिजे असेंही त्यांनी आग्रहाने सांगितले.
स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.यात अ गटात स्वराज्य शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या ब गटांसाठी आजचा युवक आणि छत्रपती शिवाजी महाराज असा विषय होता.मोठ्या संख्येने जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले.सहभागिंना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी पालकही उपस्थित होते.
संचालन दिलीप चव्हाण तर आभारप्रदर्शन विशाल जाचक यांनी केले.यशस्वितेसाठी भारती चांदुरकर, देवयानी ढोबळे,प्रणाली डुकरे, किशोरी डफळे,अमर धाने,मेसेकर,रियाज, लोखंडे, संजय मसराम इ.नी सहकार्य केले.