विद्या विकास ज्युनिअर सायन्स कॉलेजचा निकाल 99 टक्के….

0

🔥57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पैकी सिंदी केंद्रातून प्रथम 5 विद्यार्थ्यांनी मिळविला बहुमान…

सिंदी (रेल्वे)-/ नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील विद्या विकास ज्युनिअर कॉलेज सायन्स कॉलेजने यशाची परंपरा कायम ठेवली असून बारावीचा 99 टक्के निकाल लागला. सिंदी केंद्रातून प्रथम पाच विद्यार्थ्यांनी बहुमान मिळविला आहे. यामध्ये 102 विद्यार्थ्यांपैकी पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
येथील विद्या विकास ज्युनिअर कॉलेज सिंदी (रेल्वे) चा 99 टक्के निकाल लागला. 12 च्या परीक्षेला एकूण 102 विद्यार्थी बसले होते. 102 पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर सिंदी केंद्रातून प्रथम चैतन्य भगत या विद्यार्थ्याला 81.67 टक्के, यश नरड या विद्यार्थ्याला 81.50 टक्के, वैदिका डकरे या विद्यार्थिनीला 80.83 टक्के, संजना मसराम या विद्यार्थिनीला 78.50 टक्के तर शंतनू झिलपे या विद्यार्थ्याला 76.33 टक्के असे या पाच विद्यार्थ्यांनी प्रथम पाच श्रेणीत उत्तीर्ण होऊन बहुमान मिळविला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच प्राचार्य व शिक्षकांना दिले आहे. शुभांगी चरडे, सचिन जुमडे, शिरीष डकरे, प्रशांत दुधनकर, विनोद देवपूजे, विशाल शेंडे, प्रियंका महाकाळकर, सारिका वडांद्रे, स्वाती लेंडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!