विनोद भरणे हत्या प्रकरण देवळी शहरात उसळला रोष …..

0

     🔥हत्यातील मृतक विनोद भरणे वय ४५ वर्ष रा.सोनेगाव आबाजी 🔥माजी खा.रामदास तडस,युवा संघर्ष मोर्चा,हजरत दिनशावली मज्जित ट्रस्ट,यांनी शेकडो लोकांसोबत दिले ठाणेदारास निवेदन…🔥बहुजन समाज पार्टीने केला विनोद भरणे हत्याप्रकरणी केले रस्ता रोको आंदोलन.🔥देवळीतील शेकडो महिला पुरुषांनी केला ठाण्याचा घेरा.🔥देवळी शहरात तणावपूर्ण शांतता,पोलिसांचा चोखा बंदोबस्त.

देवळी -/ काल सोमवारी २४ जून रोजी सोनेगाव रोडवरील पोलीस वसाहतीसमोर एका दारुड्या नशेबाज तरुण करण कैलास मोहिते नावाच्या तरुणाने आपल्या गावी परत जाण्याच्या मार्गावर असलेल्या विनोद डोमाजी भरणे वय ४५ वर्ष रा.सोनेगाव आबाजी यांना पैशाची मागणी केली त्यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर दगडाने वार केला त्यामध्ये त्यांच्यासोबत असलेली गावातील महिला मीरा शालिक मुन,रा.सोनेगाव आबाजी ही महिला जखमी झाली.व विनोद भरणेने समोर पळ काढला परंतु नशेत बेधुंद असलेल्या करण मोहिते ने पुन्हा त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केला आणि ते खाली कोसळले खाली कोसळल्यानंतर दहा-बारा फूट त्यांना ओढत नेऊन पुन्हा त्यांच्या डोक्यावर तीन-चार वेळा दगडाने वार केला हे सर्व घटना पोलीस वसाहतीसमोर घडत होती.आणि लोक मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते.विनोद भरणे या हल्ल्यात जागीच ठार झाले. पोलीस वसाहत समोर असताना कोणीच पोलीस व नागरिक त्यांच्या मदतीला आले नाही शेवटी पोलिसांना फोन करून माहिती दिली व पोलीस तातडीने घटनास्थळी आले व दारुड्या नशेडी करण मोहिते याला पकडले.
विनोद भरणे हत्या प्रकरणातील व्हिडिओ क्लिप वाऱ्यासारखी देवळी शहरासह अख्ख्या जिल्ह्यातही पसरली आणि सर्व स्तरातून या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आणि देवळीकर जनतेत या हत्याप्रकरणी रोष निर्माण झाले.
मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान माजी खा.रामदास तडस यांनी शहरातील शेकडो महिला व पुरुषांसह देवळी पोलीस स्टेशन मध्ये येऊन निवेदन दिले.त्यामध्ये देवळी शहरात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय त्वरित बंद करा आणि अवैध झोपडपट्ट्या निर्माण करून राहत असलेले करण मोहिते सारखे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या अवैध झोपड्या त्वरित हटवा आपल्या निवेदनातून अशी मागणी केली. त्यावेळी भडकलेल्या लोकांनी पोलिसांना चांगलेच खडसवले काही महिलांनी रडू रडू आपली आप बिती सांगितली त्यानंतर देवळीतले वातावरण चिघळल्यासारखे वाटत होते.
दुपारी बारा वाजता युवा संघर्ष मोर्चा च्या वतीने शेकडो महिला व पुरुषांना घेऊन ठाण्याचा घेराव करून ठाणेदार व देवळी पुलगाव चे उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांना निवेदन दिले. आपल्या निवेदनातून त्यांनी सांगितले की देवळीत मोठ्या प्रमाणात गांजा,व दारूची विक्री होत असल्याने देवळीत नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे त्यामुळे गुन्हेगारीतील वाढ झालेली आहे हे अवैध व्यवसाय त्वरित बंद करून गुन्हेगारावर कडक कारवाई करावी.
हजरत दिनशावली अँड मजीद ट्रस्ट कडून उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.हजरत दिनशावली अँड मजीद ट्रस्टच्या जागेवर अवैध झोपड्या निर्माण करून करण मोहितेसारखे सरहित गुन्हेगार येथे अवैध वास्तव्य करतात त्यांना त्वरित तेथून हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्यानंतर बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्हा डॉक्टर मोहन राईकवार यांच्या नेतृत्वामध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळी वर्धा यवतमाळ पुलगाव चौफुलीवर बीएस पी व ग्रामीण लोकांनी चक्का जाम केला व वाहनांची रांग लागली शेवटी वाहनांना बायपास रोड वरून काढण्यात आले डॉक्टर राईकवार यांनी बहुजन समाज पार्टीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की देवळी शहरातील अवैध धंदे दारू गांजा जुगाराचे अड्डे तसेच करण मोहिते सारख्या सरहित गुन्हेगार अवैध झोपड्या निर्माण करून राहत असलेले झोपडपट्ट्या त्वरित हटवा आणि बहुजन समाज पार्टी चा कार्यकर्ता विनोद भरणे याच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी चक्काजाम करून केली. हे चक्काजाम दोन ते तीन तास सुरू राहिले शेवटी देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव व ठाणेदार सार्थक नेहाते व उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन तहसीलदारां तर्फे अवैध झोपडपट्टी हटविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर वाहनांची रेलचेल रोडावरून सुरू झाली. शेवटी विनोद भरणे यांचे मृत्य शरीर शव विच्छेदन करून याच मार्गी येणार होते परंतु पोलीस प्रशासनाने वेळेवर सतर्कता बाळगून विनोद भरणे यांचे मृत्य शरीर दुसऱ्या मार्गे पोलीस बंदोबस्तात सोनेगाव आबाजी येथे पाठविण्यात आले.
गावात तणावपूर्ण शांतता आहे पोलीस प्रशासनाने चोखा बंदोबस्त लावलेला आहे तरीही बारा वाजताच्या दरम्यान शहरातील काही लोकांनी अवैध झोपडपट्टीवर धाव घेतली परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.याप्रकरणी आरोपी करण मोहिते यास अटक झाली असून या हत्या प्रकरणी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात देवळीचे ठाणेदार सार्थक नेहाते करीत आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!