वेकोली उकणी परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केव्हा करणार !…..

0

🔥कामगार नेते संजय खाडे पुढाकार घेणार!.

वणी -/  बाळासाहेब खैरे  वेकोलिने आपल्या खान उद्योगासाठी उकणी परिसरातील अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. गावात राहणाऱ्या अनेक नागरिकांचे सदर डब्ल्यूसीएलच्या प्रकल्पात घरे गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. यासाठी तेथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी डब्लू सी एल च्या अधिकाऱ्याकडे उंबरटे झिजवले. परंतु शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या. त्यामुळे अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाची समस्या अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तां समोर आवश्यक समस्या व नोकरीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येत्या आठवड्यात शेतकरी व प्रकल्पग्रस्त च्या मागण्या मान्य न झाल्यास उकणी येथील पीडित शेतक-यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम ताडाली येथील वणी सब एरिया क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर गावातील सर्व शेतकरी व प्रकल्पग्रस्त तरुण आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. पीडित शेतक-यांच्या आंदोलनाला कामगार व शेतकरी नेते संजय खाडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.
कारण डब्लू सी एल ने मौजा उकणी, बेलसणी सह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्यातील उकणी या गावाची पुनर्वसन प्रकिया शेवटच्या टप्पात आहे. मात्र बांधकाम विभागाने घरांचे मुल्यांकन करताना जो दर लावला आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अतिशय अल्प मोबदला मिळणार आहे. या मोबदल्यात घरं बांधणं अशक्य आहे.
शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पुढील प्रमाणे असणार आहे. त्यामुळे 2025 च्या सीएसआर रेट नुसार घरांचे मुल्यांकन करावे. तसेच सेक्शन 11 नुसार निघालेल्या दिवसपासून बांधकाम मूल्यांकन जोडून 12% व्याज दर लावून मूल्यांकन करण्यात यावे. उकणी, खंड नं.1 मधील उर्वरित जमीन विनाअट निलजई डीप विस्तारी करणासाठी तत्काळ संपादित करावी, तसेच भुधारकांना मोबदला व नोकरी द्यावी. अशी मागणी वेकोलिच्या क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतक-यांच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज – संजय खाडे
जमीन म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. आपल्या परिसरातील नागरिकांची उपजिविका ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतक-यांनी वेकोलिला आपली जमीन व घरं दिलीत. मात्र प्रशासन योग्य मोबदला न देता सुळावरची पोळी खात आहे. लोकप्रतिनीधी देखील मूग गिळून गप्प आहेत. जगाच्या पोशिंद्याला असे अगतिक होऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.
यापूर्वी पुनर्वसन व योग्य मोबदल्यासाठी अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलीत. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे अखेर शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, सुरेश वी, विलास खापने, अर्जुन खापने, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदुरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत. त्यामुळे वेकोलीने सदर निवेदनाची दखल न घेतल्यास उपोषण उग्र होणार असल्याची चर्चा आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!