🔥वेल्सपण फाउंडेशन फॉर हेल्थ अँड नॉलेज तर्फे जागतिक कापूस दिवस साजरा.
वर्धा -/वेलस्पन फाऊंडेशन फॉर हेल्थ अँड नॉलेज,वर्धा यांच्या वतीने जागतिक कापूस दिवस साजरा करण्यासाठी शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत शेतकरी बांधवांना उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली आणि आधुनिक कृषी पद्धतींचे प्रशिक्षण दिले गेले.
कार्यशाळेतील मुख्य विषयांमध्ये उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञान, अती घनता लागवड पद्धत (HDPS), Detopping, Crop Mapping, कचरा मुक्त कापूस, स्वच्छ कापसाचे महत्त्व तसेच 5% निंबोळी अर्काचा डेमो यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे मार्गदर्शन दीपक खांडे व सतिश हिवरकर यांनी केले, तर क्षेत्र समन्वयक म्हणून सुनिल गोमासे व भाग्यश्री बकाले यांनी सहभागी शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ला दिला.
वेलस्पन फाऊंडेशनच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षित पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, ज्यामुळे कापूस पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.