राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्याधिकारी यांना निवेदन.
हिंगणघाट -/ शहरांतील काळी सडक रोड वरती घाणीचे साम्राज्य असून तिथे पडलेल्या खड्डा त्वरित बुजविण्यात यावे याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
स्वच्छ भारत अभियानाला लाजवणारी हि बाब आहे, स्वत नगरपालिकाच या अभियानाला बट्याबोळ करायला निघाली आहे. नगर परिषद बहुतेक झोपी गेलेले आहे. मागील काही वर्षा पासून मोहता भवनच्या मागच्या भागाला काळी सडक येथे नगर पालिकेचे बंडीवाले तसेच आजूबाजूचे परीसरातील लोक येथे भरमसाठ कचरा आणून टाकतात. या मध्ये प्लास्टिक, उष्ट अन्न, तसेच अनेक प्रकारचा कचरा याभागात टाकल्या जात आहे. तसेच इथे वर्ष भरापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे. त्यात पावसाचे पाणी साचत असते, साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात डेण्गुच्या प्रभाव वाढत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले आजारी पडत आहे. याच परिसरातील एका मुलाला डेंगूच्या आजाराची लागण सुद्धा झाली आहे. तरी नगर परिषदेचे झोपेचे सोंग करीत आहे. परिसरातील नागरिक दुर्गधीमुळे घरातील दारे दिवसभर बंद करून ठेवतात. तसेच लहान मुले खेळायला बाहेर निघू शकत नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असतात. नगर परिषदेच्या माध्यमातून एक बोर्ड लावून येथे कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे बोर्ड लावल्यास कचरा टाकण्यास आळा बसेल.नगर पालिकेने येथे कचरा टाकणे बंद करावे. कचराची व्यवस्था गावाच्या बाहेर करावी, तसेच येथे जो खड्डा पडला आहे. तो त्वरित बुजविण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर,शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, ओबीसी महिला शहर अध्यक्ष आचल वकील, सुनिता तांमगाडगे,शोभा मगर, नरसिंन पटेल, वंदना काटकर, स्नेहा साठे, रुबिना बेगम, रश्मी पात्रेकर, कोमल जाचक, ज्योती वकील, उर्मिला वकील, जावेद पटेल, हेमंत वकील, विठ्ठलराव वकील, विजय रानपरात्र, आयुष पटेल, मुकेश काशीनिवास आदी उपस्थित होते.