वर्धा -/क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत मा.सुनील वारे,महासंचालक बार्टी पुणे व मा.इंदिरा अस्वार,निबंधक बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी स्मृतीपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आज दि.४ डिसेंबर २०२४ नागपूर येथील सिद्धेश्वरी गोंड वस्ती,नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनिल वाळके,सहा.प्रकल्प व्यवस्थापक बार्टी नागपूर तर प्रमुख उपस्थिती म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध विचारवंत श्री ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करून करण्यात आली.याप्रसंगी कु.शीतल गडलिंग यांनी संविधान प्रस्ताविकेचे महत्व विशद केले.तर भारतीय संविधान याविषयावर श्री तुषार सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.श्री खुशाल ढाक यांनी वस्तीबाबत माहिती देत येथील विद्यार्थी विविध खेळात प्राविण्यप्राप्त असून पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव व अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आव्हान आपल्या भाषणात केले.त्याचप्रमाणे पालकांनी व्यसनमुक्त होऊन वाईट व्यसनांचा त्याग करून बचत झालेला पैसा हा विद्यार्थ्याच्या आहार व शिक्षणावर खर्च करावा असे मत श्री ज्ञानेश्वर रक्षक यांनी मांडले.बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच आदिवासी विभाग,समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत आपल्यात असलेल्या कौशल्य व गुणांचा विकास साधण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे शिकाल तरचं यशस्वी जीवन व आनंदी जीवन जगाल असे मत अध्यक्षीय भाषणात श्री अनिल वाळके यांनी केले.याप्रसंगी सिद्धेश्वरी गोंड वस्ती येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळात उत्कृष्ट कामगिरी करीत विजय प्राप्त केला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद विदर्भ क्रिकेट असोसिएशन ने घेतली असून येथील विद्यार्थी लवकरच मुंबई येथील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे श्री खुशाल ढाक यांनी यावेळी सांगितले. त्याअनुशंगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा व त्यांच्या पालकांचा ब्लेंकेट व संविधान उद्देशपत्रिका देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलमान शेख तर आभार नागेश वाहूरवाघ यांनी मानले याप्रसंगी बार्टी कार्यालयाच्या श्रीमती सरिता महाजन,गोंड वस्ती येथील शिक्षकवृंद विद्यार्थी तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.