वर्धा,वडणेर -/हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन विशेष उपक्रम‘शिका व कमवा’अंतर्गत राखी प्रशिक्षण व विक्री पंधरवाडा ०५ ऑगस्ट २०२४ पासून राबविण्यात येत आहे.महाविद्यालयातील विद्यार्थी अध्यापनाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा आणि आपल्या अंतर्गत गुणांच्या आधारे व्यावसायिक कौशल्य अधिकाधिक विकसित करून रोजगार निर्मिती करावी या अनुषंगाने महाविद्यालयाचे संस्थापक सचिव आणि राखी स्टॉलचे उद्घाटक प्रा. दिवाकर गमे यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनातून गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुरेख राखी बनविनाचे व व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. सारिका चौधरी म्हणाल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांची जोड देऊन विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणाचे धडे देण्यात येईल.या उपक्रमातून बनविलेल्या राख्या ग्रामीण परिसरात स्टॉल च्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.फोम शीट, सेक्विन्स, ग्लिटर इत्यादी सजावटीच्या साहित्याचा वापर करून राखीचा पाया सजवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सॅटिन टेप, रिबन, मणी, मोती, कुंदन, रेशमी धागे इत्यादी विविध वस्तू वापरून सुंदर राख्या बनवल्या. त्यांची कलाकृती खूपच आकर्षक होती आणि मुलांनी या उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला. असे उपक्रमाच्या समन्वयक प्रा. आरती देशमुख गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी सांगितले.कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव अविनाश गमे, माजी प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोद मुडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश बहादे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी सर्वांना सुरेख राख्या खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने व अल्पोहाराने झाला.