शिर्डी अधिवेशनासाठी वर्ध्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे ९३ शिलेदार रवाना….

0

वर्धा -/ शिर्डी येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी वर्ध्यातील ९३ पत्रकारांचा जत्था आज शुक्रवारी सकाळी रवाना झाला.यावेळी पत्रकारांच्या दोन्ही ट्रॅव्हल्सला ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ वझूरकर यांनी हिरवी झेंडी दाखवत रवाना केले आणि अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्यात.व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांची देशातील एक नंबरची संघटना आहे.संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीप काळे यांनी “लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठींचा” या मथळ्याखाली महाराष्ट्र आणि देशातीलचं नव्हे तर जगातील पत्रकारांना एका सुत्रात बांधले आहे. अशा या व्हॉईस ऑफ मीडियाचा साईबाबांच्या नगरीत दोन दिवस मेळा भरणार आहे. शनिवार ता.३१ ऑगस्ट व रविवार ता.१ सप्टेंबर रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारात पत्रकारांसाठी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण ९३ सदस्य आज सकाळी दोन ट्रॅव्हल्सने स्थानिक विश्रामगृहावरुन रवाना झालेत. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ वझूरकर यांनी हिरवी झेंडी दाखवत पत्रकारांना अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, निलेश पिंजरकर, सचिव एकनाथ चौधरी, प्रवक्ता संजय धोंगडे, साप्ताहिक विंगचे उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, पंढरी काकडे, गजानन बाजारे, सुधीर खडसे, आनंद छाजेड, डॉ प्रमोद लाखे, बादल वानकर, निर्भय पांडे, गणेश शेंडे,ईकबाल पहेलवान,राजू वाटाणे, सागर झोरे,राजू डोंगरे,प्रमोद एडाखे, संजय देसाई, रवी येणोरकर, पंकज गादगे, सचिन पोफळी, संजय बोंडे, यशवंत वांदिले, भारत घवघवे, प्रदिप डगवार सह व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!