हिंगणघाट -/शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी वर्धा हिंगणघाट तालुक्यातील नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.दिनांक: २० मार्च २०२५ रोज गुरुवारला सायंकाळ च्या वेळेस जवळपास ५० ते ६० वाळू भरलेले टिप्पर ,हिंगणघाट तालुक्याच्या नदीपात्रातून वडनेर ,अल्लीपुर, कवळघाट, धोत्रा मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्याबाबतचे व्हिडिओ फुटेज व संबंधित फोटो जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त,पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले की,वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टीप्परच्या मार्गाने आपल्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट तसेच तहसील कार्यालय ,हिंगणघाट व पोलीस विभागातील पोलीस स्टेशन ,वडनेर तसेच पोलीस स्टेशन अल्लीपुर यांचे कार्यक्षेत्र असून सुद्धा या प्रकारची रेतीची चोरटी वाहतूक राजरोस पने सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागातील वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी फक्त कागदावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गट तयार करून वरिष्ठांना दाखविण्याकरिता ठेवले आहे. परंतु त्यांच्या मार्फत कुठलीही कार्यवाही होत नाही.
मागील काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील काही महसूली अधिकारी यांनी आपल्या कामाची पावती देत, वाळूची चोरटी वाहतूक करणारे (छोटे व्यवसायिक ) ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून, ती बातमी वृत्तपत्राद्वारे प्रकाशित केली .परंतु तालुक्यातील इतर भागातून वाळू चोरीची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रक कधीही पकडून, त्यांच्यावर कारवाई करताना दिसले नाही. सदर वाळूची तस्करी करणाऱ्या टिप्पर व ट्रक मालकांवर सत्तेतील असलेल्या कुठल्या नेत्याचा, लोकप्रतिनिधिचा आशीर्वाद आहे काय? किंवा त्यांचा प्रशासनावर दबाव आहे काय? असा प्रश्न माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना करण्यात आला.तरी आपण तात्काळ सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून निष्पक्षपाती कारवाई ताबडतोब करावी.
आपल्या विभागामार्फत कार्यवाही होत नसेल किंवा कारवाईस दिरंगाई होत असेल तर , सदर रेती माफिया हे सत्तेतील असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादाने कुणाला न घाबरता रेती तस्करी सुरूच ठेवेल.उद्या बीडची पुनरावृत्ती या वर्धा जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या वतीने आपणास नम्र विनंती करण्यात आली की, शासनाचा महसूल बुडू नये म्हणून वाळू चोरी करणाऱ्या या रेती माफीयावर तात्काळ कारवाई करावी. यावर मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
निवेदन देताना पक्षाचे उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, शितल चौधरी ,अनंता गलांडे, चंद्रकांत भुते उपस्थित होते.