शिवसेना शाखा साहुर तसेच शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन….

0

🔥तलाठी पेंदोर व ग्रामविकास अधिकारी बनसोड यांचा सर्वे वादाच्या भोवऱ्यात,संत्रा मोसंबी फळगळ प्रकरण.

आष्टी,साहूर -/ तालुक्यातील जामगाव,माणिकवाडा, रूद्रापुर मौजाचा चुकीचा सर्वे करून फळगळीचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी जाहीर झाली असून शेतकऱी तहसील कार्यालयावर धडकला याबाबत सविस्तर वृत्त असे की मागिल पावसाळ्यात संत्रा मोसंबी फळगळ मोठ्या प्रमाणात झाली होती तेव्हा शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले व नुकसान भरपाई मिळण्याची विनंती केली होती तेव्हा तहसीलदार मॅडम यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा केला तसेच सुमित दादा वानखडे आमदार यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आष्टी तालुक्यातील सर्व मौजात समाधान कारक मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले परंतु जामगाव माणिकवाडा रूद्रापुर मौजा मात्र अपवाद ठरला या मौजा तील सर्वे करणारे कर्मचारी हे शेतकऱ्यांचे वैरी असल्याचे दिसून आले असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले कारण सर्व मौजात २५ ते ३० हजारांपर्यंत हेक्टरी मदत मिळाली परंतु जामगाव माणिकवाडा रूद्रापुर येथे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वैतागून शेतकरी व शिवसेना शाखा साहुर चे पदाधिकार्यांनी तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले चुकीचा सर्वे करून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली तसेच संत्रा मोसंबीची बाग असुन सुद्धा त्या शेतकऱ्यांची नावे लिस्टमध्ये आली नाही हा अत्यंत चुकीचा सर्वे असुन या कर्मचाऱ्यांनी घरी बसून तर सर्वे केला नाही? असे प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत निवेदन देतेवेळी शिवसेना शाखा साहुर चे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते यामध्ये चंद्रशेखर नेहारे, बाबारावजी गावंडे, गजानन बिजवे ,मारोतराव लवनकर, गोपालराव गावंडे ,प्रभाकर लवनकर , चंदू भाऊ गावंडे, पंकज दरडे, भीमरावजी गावंडे , दिलीप पोटे, शरद वरकड, प्रवीण धांदे, छगण ढोरे, विजय गावंडे ,प्रवीण मोहिते, श्याम शिर्के , प्रफुल मुंदाने इत्यादी उपस्थित होते जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले हे विशेष

शरद वरकड साहसिक NEWS-/24 आष्टी साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!