शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये अनुदान देण्याचे मागणीसाठी लहान आर्वी ग्रामपंचायत मंत्रालयात…..

0

🔥ई पिक नोंदनी ची चीअट शिथील करा.

🔥ग्रामपंचायत कमेटीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठरावासह निवेदन.

आष्टी (शहीद) -/ तालुक्यातील लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील विविध मौजात शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ई-पीक नो़ंदनीची अट शिथिल करून सरसकट ५००० हजार रुपये अनुदान मंजुर करण्याच्या मागणीसाठी लहान आर्वी ग्रामपंचायत कमेटीने सरपंच सुनिल साबळे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयात ठरावासह निवेदन सादर केले.राज्य शासनातर्फे सन २०२३ खरीप सोयाबीन आणि कापुस पिकाची ई- पीक नोंदनी केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार अर्थसहाय्य अनुदान मंजुर करण्यात आले.यामध्ये लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील रहिवासी असलेल्या मौजा लहान आर्वी,लिंगापुर, जमरतपुर , विठ्ठलापुर आणि सुजातपुर , चेकबंदी तसेच जैतापुर येथील अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन “ई पिक नोंदणी” केली मात्र केलेली ई- पीक नोंदनी अपलोड झाली नसल्याने पाच हजार रुपये अर्थसहाय्य अनुदान यादीत अनेक शेतकरी आले नाहीत.यामुळे पाच हजार रुपये अनुदानासाठी अपात्र झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने लहान आर्वी ग्रामपंचायतला अर्ज सादर केले होते.त्या अनुषंगाने लहान आर्वी ग्रामपंचायतने मासिक सभा चे ठरावं क्रमांक ८ नुसार राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे सन्मान करणारे सरकार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील रहिवासी असलेल्या विविध मौजातील सर्व शेतकऱ्यांना ५०० रूपये अनुदान मंजुर करण्यात यावे असा ठराव मंजूर करून शेतकऱ्यांनी केलेले अर्ज आणि ग्रामपंचायत ठराव सह निवेदन ग्रामपंचायत कमेटीने सरपंच सुनिल साबळे यांच्या नेतृत्वात मंत्रालयात जाऊन संबंधित विभागास सादर केले.यावेळी उपसरपंच अमोल होले,ग्रा.पं.चे सदस्य सागर नागापुरे, नितीन निंभोरकर,वैभव काळमेघ,प्रणय लंगडे,मनोहर खानजोडे,आदी उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक news-24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!