शेतकऱ्याने महामार्ग नाली बांधकाम थांबविले.तहसीलदारांना निवेदन बांधकाम अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.
देवळी -/देवळीतील विश्रामगृह ते यशोदा बायपास पर्यंत पावणे चार किलोमीटर अंतराचे नाली व रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेले नालीचे बांधकाम चर्चेचा विषय असून याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन मुळीच लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे? सुरू असलेले नालीचे बांधकाम पुढील रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टिकोनातून अयोग्य असल्याची सर्व स्तरावरून चर्चा होत असताना शेतकऱ्यांचा सुद्धा या नाली बांधकामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्यास रोख थांब होणार असल्याने चिंतेचा विषय झालेला आहे. सुरेश वैद्य व त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याकरिता महामार्गावरील लहान नाली आहे यामुळे शेतातील पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होऊन शेतामध्ये पाणी साचत असल्याने शेती पिकाचे व शेतीचे नुकसान होत असल्याचा तक्रारी रस्ते महामार्ग विभागास व तहसीलदार वारंवार निवेदन देऊन समस्याचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.परंतु या समस्या निराकारणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्याने निवेदनातून व्यक्त केले आहे.सध्या सुरू असलेले नालीचे बांधकाम झाल्यास शेतकऱ्याने थांबविले असून शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याकरिता रुंद नाली पूल बांधण्यात यावा या मागणी करिता काम थांबवलेले आहे.शेतातील पाणी वाहून जाण्याकरिता अंडरग्राउंड पाईपलाईनच्या ठिकाणी बांधकाम करून परिसरातील शेतात थोपणारे पाणी काढून द्यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.नाली बांधकामाचा वीस वर्षापासून पाठपुरावा रस्त्यामध्ये टाकण्यात आलेला कमी व्यासाचा ढोला शेतातील पाणी वाहून जाण्याच्या दृष्टिकोनातून लहान पडत असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचते व शेत पिकाचे नुकसान होते याकरिता शेतकरी सुरेश वैद्य व इतर शेतकरी मागील वीस वर्षापासून प्रशासनाकडे निवेदने निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहे परत त्यांनी नालीचे बांधकाम सुरू झाल्यावर देवळी तहसीलदार यांना निवेदन देऊन महामार्गावरील नाली बांधकाम करण्या अगोदर पाणी वाहून जाण्याकरिता लहान पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, शेतकरी सुरेश वैद्य. शेतकऱ्याप्रती व त्यांच्या समस्या कडे शासनाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते त्याची दखल घेण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना समस्याची जाणीव करून घेण्याकरिता घटनास्थळावर पाठवून पाहणी केल्यावर व परिस्थितीचे आकलन केल्यावर सत्यता दिसून येईल जेणेकरून शेतकऱ्याचे म्हणणे खरे की खोटे हे लक्षात येईल सत्यतेला पाहून व त्याची दखल घेऊन त्वरित नाली बांधकामाची मागणी किती गरजेची आहे हे लक्षात येईल.