शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करणे थांबवा : देवळीत शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन
-
-
प्रतिनिधी / देवळी :
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आज शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त होताना दिसून आले
शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवण्याबाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवळी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व तहसीलदारांना निवेदन दिले.
इगतपुरी येथील आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल केलेले कलम 353 चा गुन्हा तातडीने मागे घ्यावा तसेच मिटर रीडिंग नुसार बिलाची दुरुस्ती करण्यात यावी जेणे करून शेतकऱ्यांना विज बिल भरणे सोयीचे होईल तसेच सब स्टेशन मधून किंवा पूर्ण डीपी बंद करून वीज पुरवठा खंडित करणे हे बेकायदेशीर कृती तातडीने थांबवण्यात यावी ह्या मागण्यांना धरून हे ठिय्या आंदोलन केले गेले,
शेतकऱ्यांच्या शेतात रब्बी हंगामातील पिके फळबागा उभा आहेत सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याचा धोका आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन खंडित करू नये असे कार्यकर्त्यांनी अभियंत्यांला सांगितले, यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-