हिंगणघाट -/ टॅलेंट फुल ऑन चे संचालक अभिषेक सिन्हा आणि डिझायनर फॅशन डिझाईन स्वाती सिन्हा यांच्या द्वारा टॅलेंट रनवे सीजन ३ चे आयोजन ग्रीन विलेज रिसॉर्ट मालाड मुंबई येथे करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून ऑडिशन द्वारा मिस, मिस्टर, मिसेस आणि किड्स या कॅटेगरी करता सर्वोत्तम स्पर्धक निवडल्या गेले. या स्पर्धकांचे ग्रुमिंग, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन आणि रॅम वॉक कोरिओग्राफी ची जबाबदारी समर्थ इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन च्या संचालिका आणि मिसेस इंडिया २०१८ च्या फर्स्ट रनर अप श्रृती दुधलकर सोरटे यांनी सलग तिसऱ्यांदा यशस्वीपणे पार पडली. ही कामगिरी करीता त्यांना महाभारत मालिकेतील ‘शकुनी मामा’ सुप्रसिद्ध अभिनेता पुनीत भट यांच्या हस्ते बेस्ट फॅशन रनवे कोरिओग्राफर व ग्रूमर या अवॉर्ड ने मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमात टीव्ही आणि चित्रपट जगतातील नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभली. यात अभिनेता पुनीत भट, करण शर्मा, गुरप्रीत सिंह, मजिंदर करिर, कबीर सिंह, अभिनेत्री पूजा सिंह, सोनम लांबा, अमिता यादव, प्रोडुसर अमित कुमार, सुप्रसिध्द गायिका तृप्ती शाक्या, सुप्रसिध्द गायक संगीतकार अरविंदर सिंह, म्युझिक डायरेक्टर – कंपोजर केह आर वाही, डायरेक्टर मनोज शर्मा, राजीव रुइया, फॅशन फोटोग्राफर अरुण पाण्डेय, इत्यादी कलाकारांची उपस्थिती लाभली. श्रृती ह्या स्थानिक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्राध्यापक असून विधी सलाहगार म्हणून देखील कार्यरत आहे. तसेच त्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात जुळल्या असून विद्यार्थी आणि स्त्रियां करता विविध क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. या सोबतच त्या नृत्य दिग्दर्शन, अभिनय, नाटक, निर्देशन, रॅम्प वॉक कोरिओग्राफी, मॉडेलिंग, वक्तृत्व कला, संचालन, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य, विवीध शैक्षणिक उपक्रम, इत्यादी क्षेत्रात त्यांची आवड असून त्या या क्षेत्रांमध्ये देखील कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.