वर्धा -/संक्रांती म्हणजे संस्कारांची क्रांती; संक्रांतीच्या सणाला आपण सगळे एकत्र येऊन विचारांचे आदान प्रदान करीत असतो. पण वास्तविक पाहता आज नकारात्मकतेचा आदान प्रदान जास्त प्रमाणात होते, व त्यामुळे आपल्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. या सणाला आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश देतो. ज्याप्रमाणे तिळाला स्निग्धता व गुळाला गोडवा असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपसे संबंधांमध्ये एकत्र राहून स्नेह व आपुलकीचा गोडवा वाढवायचा आहे. असा संदेश वर्धा सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी अपर्णा दीदी यांनी दिला. माहेर शांती निवास सेलूच्या मायाताई शेळके यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्यामध्ये स्थिरता येते व अनेक परिस्थितींचा सामना करण्याचा बळ येते . ज्या पद्धतीने आपण वाणाचे आदान प्रदान करतो त्याप्रमाणे सुखाचा आनंद प्रदान करावे,असा संदेश देऊन सेलू सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी दर्शना दीदींनी , आलेल्या महिला भगिनींचे आभार व्यक्त केले. कुमारी मेघना सावरकर हिने सुंदर नृत्य प्रस्तुत केले.महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले व तिळगुळ देऊन संक्रांती साजरी करण्यात आली.