संताजी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तेली समाज संघटनांनी तहसीलदार यांना दिले निवेदन…

0

सेलू / ७ मार्च रोजी संताजी अखिल तेली समाज संघटन सिंदी रेल्वे तथा सेलु तालुका जि.वर्धा यांच्या वतीने संस्थापक अनिल बजाईत यांच्या मार्गदर्शनाखाली सेलु तालुकाध्यक्ष  संजय कोपरकर यांच्या नेतृत्वात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना तहसिलदार साहेब सेलु यांच्या मार्फत “श्री संताजी आर्थिक विकास महामंडळ” महाराष्ट्र राज्यात तेली समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय उत्थानासाठी स्थापन करण्यासाठी निवेदन देण्यात आले.या निवेदनात तेली समजाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.तेली समाजाचा पूर्वापार चालत आलेला तेलघाणीचा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय मोळकळीस आला आहे.तसेच त्यांच्या इतर समस्यांना सखोल समजणे आवश्यक आहे. यातूनच श्री संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी असे निवेदनातून विनंती केली गेली आहे.उपस्थिती पदाधिकारी तालुकाध्यक्ष संजय कोपरकर,दिलीप पोहाने तालुका उपाध्यक्ष,किशोर डकरे शहराध्यक्ष सिंदी रेल्वे,सुरेश लाजुरकर, देवेंद्र झिलपे,मोहन झिलपे,प्रभाकर झिलपे आदी उपस्थित होते.आदरणीय तहसिलदार साहेब सेलु जि.वर्धा यांनी संघटनेचे माध्यमातून दिलेले निवेदन मुख्यमंत्री साहेब यांच्या पर्यंत पोहोचविण्याचे कार्य करू.असे आश्वस्त केले.

चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!