संत भोजाजी महाराज मंदिराश्रीत श्री गुरूदेव सेवा मंडळ सालोड – हीरापूर च्या वतीने विविध कार्यक्रमात खंजिरी भजनावलीचा कार्यक्रम….

0

   पुरणपोळीचा महाप्रसाद श्री ला अर्पण!.

आजनसरा -/ श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे सालोड हिरापुर येथील गुरुकृपा भजन मंडळाने विविध कार्यक्रमात साजरा केला भजनाचा कार्यक्रम. 26 जून ला विधीवत पुजा आयोजक  मारोती वैतागे यांनी सर्व प्रथम श्री संत भोजाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन श्री गुरूदेव खंजिरी भजना सुरूवात झाली.कार्यक्रमात घोडा चालला भोजाजी बाबाचा या गीताला भगतांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सर्वस्वी अनिल कोहाड वर्धा व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे युवा सेवक प्रशांतदादा. गुरु कृपा भजन मंडळाचे अध्यक्ष मारोती वैतागे.लक्ष्मणराव ताक. निकेश कोसुरकर. प्रमोद भातकुलकर. मधुकर अंबाडरे. अशोक ठाकरे. कालिदास खडसे प्रशांत वैतागे. प्रभाकर ढोटे. चंपतराव तेरांदे किसनाजी सोनटके कवडुजी वानखेडे. विजया क्षिरसागर. अंजना ठाकरे व गुरूदेव साहित्य प्रचारक भक्त समस्त वैतागे.संजय वैतागे.गणेश हागे. परिस वैतागे या कार्यक्रमात कार्यवाह म्हणून भुमिका बजावली. आणि सजय गुरु कृपा भजन मंडळाने उपस्थित राहून सहकार्य केले शेवटी आरती व राष्ट्रवंदना. या प्रसंगी श्री संत भोजाजी महाराज की जय जयघोषाने आजनसारा नगरी दुमदुमली होती. कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी पुरण पोळी चा महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आयोजक  मारोती वैतागे व समस्त वैतागे परिवार श्री संत भोजाजी महाराज की जय जय गुरु राम कृष्ण हरी माऊली संत गर्जुनिया सांगे। जावे त्यांच्या मागे मागे।। तुकड्या म्हणे ऐसे करा।देव होत असे सोयरा।जय भोजाजी महाराज की ञिवार जयघोष झाला.

गजानन जिकार साहसिक news -/24 तुळजापूर(वघाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!