संपादकवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट तालुका पत्रकार संघा कडून निवेदन
प्रतिनिधी / हिंगणघाट :
वर्धा जिल्हा हा पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी वर्धा नागपूर मार्गावर उड्डाण पुलाजवळ पत्रकार रविंद्रजी कोटम्बकर यांच्यावर रात्री दरम्यान हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचा हल्ला म्हणजे पत्रकारितेवर झालेला सर्वात मोठा आघात आहे.
आपल्या वर्तमान पत्रातून सतत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पत्रकार सतत आपल्या लेखनीमधून करीत असतात. परंतु अशा प्रकारचे हल्ले करून पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होताना दिसून येत आहे. हिंगणघाट शहरातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच पत्रकार या घटनेचा निषेध करीत आहेत.
या दुर्दवी घटनेत झालेला प्रकार गंभीर आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकार बांधवांना मिळत असलेले कवच सैल होऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
निवेदन देताना ज्येष्ठ पत्रकार रमेशजी लोंढेकर, अनिल कडू, इकबाल पहेलवान, सचिन वाघे कदीर बक्ष, शेख अब्दुलअमीन, शेख जावेद, प्रमोद जुमडे, सुधाकर बोरकर,मोहसीन खान, आकाश बोरीकर, गुरु मुखसिंग बावरा, जितेंद्र शेजवल निखिल ठाकरे, जाकीर भाई , अमोल झाडे, सचिन महाजन होते