संपूर्ण जिल्ह्यात पूर्व देय (prepaid) इलेक्ट्रिक मीटर बाबत जनतेला संपूर्ण माहिती मिळण्यापर्यंत स्थगिती देण्याबाबत. जिल्हाधिकारी वर्धा यांना जन-सेना संघटनेकडून निवेदन…..

0

वर्धा -/ जिल्ह्यात गेल्या काहि दिवसांपासून महावितरणकडून नवीन पूर्व देयक ऊर्जा मीटर लावण्यात येत आहे.प्रामुख्याने हे मीटर त्याच परिसरात लावण्यात आले जिथे सर्वसामान्य व्यक्तिमत्व राहतो आणि होत असलेल्या बाबींना ना सरळ विरोध करु शकत नाही.या मीटर पासून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार असल्याचे बोलल्या जाते.तसेच यावेळी जनसेना संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी एड शिवानी सुरकार,राहुल मिश्रा,पलाश उमाटे,धीरज चौहान,विकी सवाई,आकाश हतागड़े,प्रथम कुरील,आदींच्या उपस्थितीत निवेदन देऊन प्रमुख मागण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.महावितरना कडून करण्यात येणाऱ्या या मोहिमे बद्दल जनतेला कुठली जनजागृती न देता जबरदस्ती नवीन मीटर लावण्यास प्रारंभ का करण्यात आला?, लावण्यात येणारे संपूर्ण मीटर प्रत्येकाला लावणे अनिवार्य आहे का, असल्यास यावर कुठले अधिक प्रभार शुल्क लागणार आहेत का ?,समाजात मजदूर वर्ग मोठ्या प्रमाणत असून प्रत्येक व्यक्ती आर्थिकरित्या सक्षम नाही.त्यात प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोनचा वापर करीत नाही.आणि त्यात वीज वापरा अगोदर बिल कसे भरणार? तर यावर प्रत्येक वर्गानुसार काही सूट देण्यात आली का? नवीन प्रेपेड मीटर लावण्या आधी महावितरण तर्फे जाहिरात देण्यात आली का? आणि या बाबत पूर्व सूचना जनतेस देण्यात आली का?आजही आपला देश हा 70% शेतीवर अवलंबून असून शेती करतो आहे.त्यात शेतकऱ्यास जर अगोदर बिल भरून घ्यावी लागली त कितपत ते शक्य आहे.यावर आपण विचार करावा.कारण कास्तकाराला नोकरदार वर्गा प्रमाणे मासिक पगार मिळत नसून त्याला निसर्गाच्या साथीने कार्यरत राहायचे आहे आणि येणारी आवक हि टप्प्या टप्यात आहे, तर कास्तकारास हे कसे बरे उपयोगी?सर्वसामान्यांना कुठलीच माहिती न सांगता बळजबरीने जनतेकडे मीटर लावणाऱ्या अधिकाऱ्यांना मीटर बाबत संपूर्ण माहिती आहे का? मिटर लावल्यानंतर येणाऱ्या बिलाचे प्रति युनिट शुल्क किती असणार आणि त्यावर मीटर स्मार्ट झाल्यास मासिक maintanance शुल्क आकारणे बंद होणार का?यापुढे जर बिल प्रेपेड झाल्यास वीज कपात होनार नाही याची हमी असणार का? मध्यंतरी वीज कपात झाल्या यास जबाबदार कोण असणार?येणाऱ्या बिलामध्ये बिल सगळ्यांना युनिट प्रमाणे सामान येणार यासाठी कुठली उपाययोजना करण्यात आली आहे? वर्धा जिल्हात देण्यात येणाऱ्या मीटर बाबतीत आपण प्रात्यक्षिक केलेले आहेत का कि नवीन आणि जुने मीटर है समान कार्यरत आहेत आणि समानच वीज शुल्क बिल येत आहे? याचे (trial and error) परीक्षण आणि त्रुटी आकलन केले असल्यास याची संपूर्ण माहिती लेखी आम्हास जबाबदार अधिकाऱ्यांकडून देण्यात यावी. कि सर्वसामान्यांचा हितार्थ आपण याला महत्वपूर्ण बाब समजून त्वरित लक्ष केंद्रित करावे आणि येत्या 5 दिवसांचे आत लेखी प्रत्युत्तर द्यावे.अशी जिल्हाधिकारी कार्यालय कडे मागणी जनसेना संघटने निवेदन द्वारे देण्यात आलेली आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!