🔥शेतकरी मृतक शंकर मारोतराव सिराम वय ५५ वर्ष रा.बांबरडा गावातील घटना.
आष्टी शहीद -/ तालुक्यातील बांबरडा येथील शेतकरी शंकर मारोतराव सिराम वय 55वर्ष या शेतकऱ्याने घराशेजारी असणाऱ्या वडाच्या झाडाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.12डिसेंबर रोजी सकाळी उजेडात येताच एकच खळबळ उडाली.
सविस्तर असे
आष्टी तालुक्यातील वनविभागाच्या व माळरान भागात वसलेल्या बांबरडा गावातील शेतकरी हा आदिवासी समाजातील असून शेती व्यवसाय करीत होता. सतत नापिकी व शेतात जंगली प्राण्याचा हैदोस यातून शेतात होणारे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यातून ते सतत चिंताग्रस्त असायचे. जून महिन्यात शेतात पेरणी केल्यावर पिकाचे संगोपन केले. शेतातील तूर व कपाशी पिकात रात्र दिवस जागली केल्यावर दि. 11डिसेंबर रोजी शेतात गेल्यावर वन्यप्राण्यांनी कपाशी पिकाचे अतोनात नुकसान केले झालेले नुकसान मोठे असून, सतत होणारी नापिकी, आर्थिक देवाण घेव्हाण करायची ही विवानचना त्याला सतावू लागली. दिवस भर झालेली घटना नातेवाईक यांना सांगून दि.11डिसेंबर रोजी रात्री शेतात जागली जातो म्हणून पत्नी ला सांगितले आणि शेतात गेले. शेतात गेल्यावर जंगली प्राणी यांनी शेतात धुमाकूळ घातला हे पाहून त्याने गाव गाठले. गावात आल्यावर घराच्या शेजारी असणाऱ्या वडाच्या झाडाला नायलॉन दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. दि. 12डिसेंबर रोजी सकाळी शंकर हा गळफास घेतल्याच्या अवस्तेत होता. या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करून मूतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे नेला. उत्तरीय तपासणी साठी आर्वी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. गावातील मोक्षधामत त्याचवार अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांचमागे दोन मुले व पत्नी, दोन भाऊ असा अप्तपरिवार आहे.