चालू घडामोडी वर सत्यपाल महाराजांचे सत्यवाणी समाज प्रबोधन…
आष्टी शहीद -/जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या अवचित साधून जंगल सत्याग्रही घाट समितीच्या माध्यमातून जगात सुरू असलेल्या घडामोडीवर सत्यपाल महाराज यांचे सत्यवाणी समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जंगल सत्याग्रह समितीच्या वतीने दिनांक 23 मे 2024 ला तळेगाव श्यामजीपंथ येथील आठवडी बाजार परिसरात सत्यपाल महाराजाचा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक वर्धा जिल्हा भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सध्या स्थितीत जगात सुरू असलेल्या घडामोडी,समाज कोण्या दिशेला जात आहे यावर सत्यवाणी सत्यपाल महाराज यांनी जनतेला आपल्या वाणीतून प्रबोधन केले.समाज विखुरला जात असून समाजा समाजात तीळ निर्माण होत आहे.नवीन पिढी व्यस्तनेकडे वळत असल्याने अनेकांचे घरे उद्ध्वस्त होत आहे.अशा अनेक विषयावर हात समाजातील वाढत असलेली तीळ दूर व्हावी, तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या नवीन सुधारावी.करिता प्रत्येकाने समाजासाठी कार्य करावे. त्याकरिता पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष पुरवण्याची आज काळाची गरज आहे असे आपल्या वाणीतून महाराजांनी प्रबोधन केले.याप्रसंगी तळेगाव वाशी व परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक जंगल सत्याग्रही स्मारक समितीचे आयोजक सचिन होले, नवाज पठाण, राहुल बुले, दिनेश कोंडुलकर,प्रवीण ठाकरे,, भाजपा तालुकाध्यक्ष ल कमलाकर निंभोरकर राजेश ठाकरे यांच्यासह सत्याग्रही घाट समितीचे सदस्य यांनी हा कार्यक्रम कोणताच अनुचित प्रकार न होऊ देता पार पाडला