हिंगणघाट,समुद्रपूर -/ नजिकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू वाहनाने तिघे जण लाहोरी वरुन समुद्रपूरकडे जात असतांना वाहन पुराच्या प्रवाहात वाहत गेले. मात्र समयसूचकतेमुळे वाहनातील तिघांनी उडी घेत झाडावर चढून आपले प्राण वाचविले. या दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने रिक्सयू करीत सुखरूप बाहेर काढले रविवारी सकाळी ७ वाजता मुसळधार पावसामुळे समुद्रपुर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावरुन पुराच्या प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहू वाहन क्रमांक MH 40 N 5834 पुरात वाहत गेले. यावेळी वाहनात जात असलेल्या तिघेही समयसूचकता दाखवित आपला जिव मुठीत धरून एका झाडावर चढून राहले.विलास शहाणे वय ४० वर्ष, रा. जाम, हिरालाल बारेड वय वर्ष रा. राजस्थान, रामकिसन गौतम वय, ४५ रा. मध्यप्रदेश अशी पुरातून सुखरूप काढलेल्या तिघांची नाव आहे. या घटनेची माहिती समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपात्कालीन व्यवस्थेला फोन केला मात्र पुराचे पाणी वाढत जात असल्याने शेवटी कोणाचीही वाट न बघता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जवळपास ३ तासांच्या अथक परिश्रमाने ठाणेदार संतोष शेगावकर यांना आपल्या जिव मुठीत धरून तिघांना रेस्कू करीत पुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांचा जिव वाचविला.यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांना पोलिस उपनिरीक्षक देरकर, पोलिस उपनिरीक्षक टेबुर्ण, पोलिस कर्मचारी रोषण मडावी होमगार्ड सागर वाटमोडे, निलेश नागपुरे, नितिन बावणे, सुधाकर झाडे, प्रकाश घाडे, नगरसेवक ललित डगवार, हेमंत डंगवार, बादल कापकर, अतुल वावधने, विलास बेलेकर, पंकज बेलेकर, आदिंसह गावकऱ्यांनी सहकार्य केले.. ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या धाडसीपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार मानले आहेत.