बीड़कीन -/समांतर जलवाहिनीचे काम मंदगतीने चालू असल्यामुळे बिडकीन शेकटा फाटा ते निलजगाव फाटा दरम्यान मोठे खड्डे झाल्यामुळे रहदारी करणाऱ्याचे अतोनात हाल होत आहे.समांतर जलवाहिनीच्या अधिकारी व कंत्राटदारांना वारंवार सूचना देऊनही कुठल्याही प्रकारचे खड्डे व रस्ता व्यवस्थित होत नसे. त्यामुळे माझी बांधकाम सभापती विलास बापू भुमरे व बिडकीन सरपंच अशोक धर्मे यांनी जलवाहीनीचे अधिकारी व कंत्राटदार यांना तातडीने गड्डे बुजवण्याचे व रस्ता दुरुस्ती करण्याचे सूचना केल्या. होत्या.जोपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार नाही व रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत काम चालू करु नये अशा सूचना केल्या.शेकटा फाटा ते निलंगा फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून बिडकीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रशासन व कंत्राटदारांना पत्र दिले होते ग्रामपंचायत पत्राची संबंधित अधिकारी दखल घेत नव्हते पत्र दिल्यानंतर सरपंच अशोक धर्मे यांनी अधिकारी कंत्राटदारांना वारंवार फोन करून काम लवकरात लवकर करण्याचे सांगत होते परंतु अधिकारी व कर्मचारी मुज़ोर असल्यामुळे कामाची दखल घेत नव्हते. आत्ताच एक्सप्रेस प्रतिनिधीने त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कामाच्या सुपरवायझरने कांत्राटदारचा फोन नंबर देण्यास नाकार दिला व माझी बातमी लावा, माझा फोटो पेपर मध्ये लावा अशा मुज़ोर भाषेत प्रतिक्रिया दिली. माननीय उच्च न्यायालयाने शेकटा फाटा ते नीलजगाव फाटा हा जड वाहतूक करण्यासाठी बंद केलेला आहे. परंतु बिडकीन जवळील दगड खदान मधून येणारी जड वाहतूक चालूच आहे. त्यांना नेहमी सुरक्षारक्षक थांबण्याचा प्रयत्न करतात परंतु हायवा चालक सुरक्षा रक्षकांनवर हायवा टाकण्याच प्रयत्न करतात. ही जड वहातुक थांबावली तर शेकटा फाटा ते नीलजगाव फाटा दरम्यान चिखल व गड्डे होणार नाही.अशी चर्चा नागरीक करत आहेत.