सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी केला ८५ लाख रुपयाचा अपहार….

0

🔥हेच ते सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी कामगार नोंदणी फी चे ८५ लाख परस्पर केले हडप.

🔥सहाय्यक कामगार आयूक्त चंद्रपूर येथे सन २०१७ ते २०१९ रोजी कार्यरत असताना चिमुर येथील दलाल, एजेंट, राजकीय पूढारी यांना १ लाख कामगार नोंदणी पावती बुक दिले.

🔥प्रती कामगार नोंदणी फी ८५ रुपये होती ती फी शासन जमा करणे बंधनकारक होती परंतू मागील ७ वर्षापासून कामगार नोंदणी फी ची रक्कम भरलीच नाही.

🔥कामगार नोंदणी नंतर सुरक्षा व अत्यआवश्यक संचाचे वाटप केल्या गेले.

🔥जेव्हा कामगार नोंदणीच झाली नाही तर, मग सुरक्षा व अत्यआवश्यक संचाचे वाटप उज्वल लोया यांनी कोणत्या शासन निर्णयानुसार केले

🔥आपल्या हाताखालील कामगारांना ज्ञानाचे डोस पाजून अपमानित करणार्‍या या लाचखोर उज्वल लोया विरोधात अप्पर कामगार आयूक्त किशोर दहीफळकर कारवाई करणार का? जनतेचा प्रश्न

नागपूर -/ स्थानिक अप्पर कामगार आयूक्त कार्यालयत सध्या कार्यरत अप्पर कामगार आयूक्त उज्वल लोया हे सन २०१७ ते २०१९ या काळात चंद्रपूर जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयूक्त या पदावर कार्यरत होते. यावेळी त्यांनी चिमुर तालुक्यातील काही दलाल, एजंट व राजकीय पुढारी यांच्या इशार्‍यावर १ लाख कामगार नोंदणी बुक दलाल, एजेंट व राजकीय पुढारी यांना दिले. एका कामगाराची नोंदणी फी हि ८५ रुपये एवढी होती. परंतू सहाय्यक कामगार आयूक्त उज्वल लोया यांनी १ लाख कामगारांची नोंदणी करवून घेतली. नोंदणी करण्या मागचे कारणाचा शोध घेतला असता जेवढी जास्त नोंदणी तेवढे जास्त कमी-शेन या अधिकार्‍यांना मिळत होते. कमागार साहित्य वाटपात नागपूरचा कंत्राटदार उमेश पगारिया होता. जेवढ्या पेट्या किंवा सुरक्षा संच व अन्य साहित्य वाटप केले त्यानुसार पगारीया हा जिल्हा कामगार अधिकारी ते सहाय्यक कामगार अधिकारी यांना कमी-शेन देत होता. यामुळे ‘पगारिया’ च्या चक्कर मध्ये येवून ‘उज्वल’ याने आपले भविष्य ‘उज्वल’ करण्यासाठी १ लाख कामगारांची नोंदणी केली व या सर्व कामगारांना सुरक्षा संच व अन्य साहित्य वाटप केले. पण खरा प्रश्न हा आहे की, कामगारांची नोंदणी करताना प्रती कामगार ८५ रुपये नोंदणी फी घेणे बंधनकारक होते. नोंदणी फी जमा करून उज्वल लोया याने सदरची रक्कम शासनाचे कोषागारात भरणे बांधनकारक होते. परंतू या लाचखोर उज्वल लोया याने अंदाजे ८५ लाख रुपये शासन तिजोरीत न भरता स्वत:चे खिशात भरली आहे. काही तक्रारदारांनी या लाचखोराची तक्रार केली परंतू वरिष्ठ अधिकारी,कामगार मंत्री यांना ‘मॅनेज’ केल्यामुळे ‘लोया’ सध्या पैशाच्या गादीवर ‘लोळण’ घेत आहे. याला पैशाचा एवढा माज आला आहे की,हा आपले अधिनस्त कर्मचारी यांना अपशब्दानी व एकेरी भाषेत दमदाटी करतो. स्वत:चे वया पेक्षा म्हणजेच आपले पेक्षा मोठे असणार्‍या कर्मचारी यांनाही ‘‘अरे…, तुरे…’’ ही भाषा हा हरामखोर वापरतो. महिला कर्मचारी यांनाही शिविगााळ करण्यास मागे पूढे पाहत नाही. दुसर्‍याला ज्ञानाचे ‘डोस’ पाजणार्‍या ‘‘उज्वल लोया’’ यांनाच ज्ञानाचे डोज पाजण्याची वेळ आली आहे. स्वत:ला इमानदार अधिकारी समजतो तर मग शासनाची रक्कम परस्पर खर्ची घालणार्‍या वर्ध्यातील माजी अधिकर्‍याची हा बाजू घेतो. माहिती अधिकार अधिनियम २००५ चे याला अवलोकन करता येत नाही. वर्धा येथील प्रभारी जिल्हा कामगार अधिकारी सिमा शिंदे हिला ‘कवडीचे’ ही ज्ञान नाही. सिमा शिंदे यांनी दिलेल्या उत्तराची ‘कॉपी’ उज्वल लोया यांने करून आपल्या ‘अक्कलेचे’ तारे तोडले आहे. शासनाच्या तिजोरीत ८५ लाख रुपयाचा भरणा न करता स्वत:चे घर भरणार्‍या या लाचखोर उज्वल लोया विरोधात अप्पर कामगार आयूक्त किशोर दहीफहकर कारवाई करणार नाही. कारण सध्या ‘दहीफळकर’ व लोया हे एकत्र बसून ‘‘दही कलाकंद’’ खात आहे. यामुळे या ८५ लाख रुपयाच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी यांनी केली आहे.
(क्रमश:)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!