सांवगा पुनर्वसन ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी एक जुलैपासून आमरण उपोषण….

0

🔥लेखी आश्वासन पूर्ण न झाल्याने सरपंच विनोद सोनोने आक्रमक..

आष्टी,साहुर -/ सांवगा पुनर्वसन ग्रामपंचायत हद्दीतील साहूर दुर्गवाडा राष्ट्रीय महामार्गावर तथा सर्विस रोडवर काही लोकांनी साधारण बांधकाम करून अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण हटविण्यासाठी सरपंच विनोद सोनोने व सहकारी एक जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे अशी माहिती लेखी निवेदनाद्वारे सरपंच विनोद सोनोने यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे सांवगा पुनर्वसन ग्रामपंचायत हद्दीतील साहुर ते दुर्गवाडा राष्ट्रीय महामार्ग लगत काहींनी अतिक्रमण केले त्या अनुषंगाने 4 मार्चला सरपंच विनोद सोनोने कृष्णकुमार उन्होने चरणदास झोडे मारोतराव बोरवार प्रवीण डहाके विश्वनाथ ठाकरे हे आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळी 5 मार्च रोजी तहसीलदाराचे प्रतिनिधी नायब तहसीलदार दीपक काळुसे, डि.के. बारसे, मंडळ अधिकारी भेंडे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली होती त्यांनी समस्यांचे निराकरण तहसीलच्या वतीने जून पर्यंत करण्यात येईल अशी लेखी स्वरूपात ग्वाही दिली त्यामुळे उपोषण मागे घेतले होते मात्र जून महिना संपला परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे 30 जून पर्यंत मुख्य रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात आले नाही तर एक जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची माहिती सरपंच विनोद सोनोने यांनी निवेदनाद्वारे दिली त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, खासदार अमर काळे ,आमदार दादाराव केचे ,सुमित वानखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांना निवेदन पाठवले आहे.

शरद वरकड साहसिक news -/24 आष्टी साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!